Home चंद्रपूर शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत प्रा. अभिलाष गोमासे जिल्ह्यात प्रथम.

शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत प्रा. अभिलाष गोमासे जिल्ह्यात प्रथम.

63

चिमुर:- प्राध्यापक/ शिक्षकांना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची चालना मिळावी त्यांच्यात निकोप स्पर्धा वाढीस लागून अध्ययन अध्यापन अधिक प्रभावी व्हावे या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण तसेच क्रीडा विभाग शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे च्या वतीने माध्यमिक शिक्षक तथा उच्च माध्यमिक शिक्षकांकरिता 2023 -24 मध्ये दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. नुकताच स्पर्धेचा निकाल राज्यस्तरावर जाहीर करण्यात आला. त्यात चिमूर येथील नेहरू विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री अभिलाष गोमासे यांनी इयत्ता अकरावी/ बारावी गटामध्ये मराठी या भाषेकरिता जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. प्रा. अभिलाष गोमासे हे उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळखले जातात. यापूर्वीही त्यांचे दोन कवितासंग्रह तसेच शोधनिबंधक व संशोधन साहित्य (मराठी) भाषा प्रकाशित झालेले आहे. हे उल्लेखनीय, त्यांच्या या यशाबद्दल नेहरू विद्यालयाचे प्राचार्य निशिकांत मेहरकुरे, गटशिक्षणाधिकारी रुपेश कांबळे, विस्तार अधिकारी विशाल खांडेकर, स्वप्निल बोधाने, केंद्रप्रमुख महल्ले, अरविंद आत्राम (साधन व्यक्ती), मिलमिले पर्यवेक्षक, उमरे मॅडम पर्यवेक्षिका, प्राध्यापक लोडे, श्री वाघदरे, श्री. घाटे श्री.पवार श्री.गाढवे, श्री धारणे तसेच कुंभारे , देवतळे मॅडम यांनी अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here