Home महाराष्ट्र शांतता व सुव्यवेस्था साठी हिंदु मुस्लिम सह सर्व समाजाचे योगदान महत्वपूर्ण…! ...

शांतता व सुव्यवेस्था साठी हिंदु मुस्लिम सह सर्व समाजाचे योगदान महत्वपूर्ण…! चोपडा विभागाचे डी वाय एस पी अण्णासाहेब घोलप.

31

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगांव – शहरात येत्या तीन तारखे पासुन श्री बालाजी वहन व रथोत्सवास प्रारंभ होत असुन विविध ठिकाणी दुर्गाउत्सवाची स्थापना देखील करण्यात येणार आहे तरी परंमपरागत होणारे हा उत्साह सर्व समाज बांधवानी कुठेही गालबोट न लागता शांततेत साजरा करावा असे आवाहन चोपडा विभागाचे डी.वाय.एस.पी. अण्णासाहेब घोलप यांनी केले
नुकताच येथील शहर पोलीस ठाण्यात नवरौत्र उत्साहा निमित्ताने शहर शांतता कमेटीची बैठक संपन्न झाली त्या प्रसंगी श्री घोलप साहेब बोलत होते
व्यासपीठावर पो.नि.पवन देसले साहेब ए.पी आय निलेश वाघ,आदि उपस्थित होते प्रारंभी पी आय देसले साहेबांनी प्रमुख पाहुण्याचा परिचय करून दिला व कार्यक्रमाची रुपरेषा सादर केली
सदर शांतता कमेटीचा बैठकीत श्री बालाजी वहन व्यवस्थापक मंडळाचे अध्यक्ष डि.आर.पाटील.तसेच मंडळाचे सदस्य ज्ञानेश्वर महाजन यांनी आपल्या मनोगतातुन सालाबादा प्रमाणे होत असलेल्या ह्या धार्मिक उत्सवात सर्व समाज बांधवानी कायदा व सुव्यवस्थेसाठी व शहरातील शातंता अबाधित रहाण्यासाठी जाती धर्मातील लोकांनी परस्पर सहकार्य करून एकोप्याने हा धार्मिक उत्सव साजरा करण्याचे आवाहन करुन सुप्रीम कोर्टचा आदेशाचे पालन करावे असे सांगीतले.व आगामी काळात होत असलेले वहन व रथ उत्सव शांततेत व गोविदाने साजरा करण्याची हमी दिली. आभार पवन देसले साहेब यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी साठी गोपीनीय विभागाचे चंदन पाटील,सुमीत बावीस्कर,सत्यवान पवार आदींनी परिश्रम घेतले
सदर बैठकीत शहरातील हिंदु व मुस्लिम समाजातील नागरीक श्री बालाजी वहन व रथ उत्सवाचे पदाधिकारी, सदस्य,दुर्गा मंडळाचे पदाधिकारी, पत्रकार व शांतता कमेटीचे सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here