Home यवतमाळ उमरखेड शहरात दहशत निर्माण करण्यासाठी इन्स्टाग्रामवर रिल्स बनवणाऱ्या इसमावर उमरखेड पोलीसांची कारवाई...

उमरखेड शहरात दहशत निर्माण करण्यासाठी इन्स्टाग्रामवर रिल्स बनवणाऱ्या इसमावर उमरखेड पोलीसांची कारवाई ! दहशत निर्माण करणा-या रील समाजमाध्यमावर प्रसारीत न करण्याचे आवाहन..!

155

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दिनांक ३ ऑक्टोंबर) सध्या समाजमाध्यमावर वेगवेगळ्या प्रकारच्या रील बनवुन भाईगीरी करणा-याचे मोठया प्रमाणात तरुणाईमध्ये फॅड निर्माण झाले आहे.

पोलीस दल अशाप्रकारे भाईगीरी करणा-या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांच्या कृत्यावर लक्ष ठेवुन असतात. दि.३०/०९/२०२४ रोजी सपोनि भगत यांना पो.स्टे.ला हजर असताना गोपनीय बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, सोशल मिडीयावर एक व्हीडीओ व्हायरल होत असुन त्यामध्ये एक ईसम हातात एक धारदार चाकु घेऊन रिल्स बनवुन ईन्स्टाग्रामवर व्हायरल केला आहे. व सदर इसम हा घारदार चाकु गुन्हेगारी कृत्य करझयाच्या दृष्टीने सतत सोबत बाळगुन असतो. अशा खात्रीशीर माहीतीवरुन, सदर इसम शेख गौस शेख करीम वय-२५ वर्षे व्यवसाय – मजुरी रा. नागापुर रुपाळा ता. उमरखेड जि. यवतमाळ हा निष्पन्न करण्यात आला. व तो उमरखेड शहरात हजर असल्याचे समजले. यावरुन सपोनि कैलास भगत सोबत परि. पोउपनि सागर ईंगळे, पोकॉ १६५२ टेंबरे तसेच सोबत दोन पंच सह कार्यवाहीकामी उमरखेड शहर येथे रवाना झाले.

मिळालेल्या माहीतीप्रमाणे तो मीळुन आला. त्याची ओळख पटवुन त्यास त्याचे नाव विचारले असता, त्याने त्याचे नाव शेख गौस शेख करीम वय-२५ वर्षे व्यवसाय- मजुरी रा. नागापुर रुपाळा ता.उमरखेड जि. यवतमाळ असे सांगितले पंचामक्ष त्याची झडती घेतली असता त्याचे जवळ एक चाकु लाल काळया रंगाची लाकडी मुठ असलेला ज्याची लांबी टोकापसुन मुठीपर्यंत पात्याची लांबी चार ईंच व मुठीची लांबी पाच ईंच पात्याची मध्यभागी रुंदी एक ईंच बटण दाबल्यावर चालु बंद होणारा जुना वापरता चाकु किंमत अंदाजे २५०/रुपये तसेच एक ओप्पो कंपनीचा आकाशी रंगाचा जुना वापरता मोबाईल किंमत अंदाजे ८००० रुपये मिळुन आले. त्याचे ईन्स्टाग्राम आय डी armansheikh_sheikh_7_7_7 ओपन करुन अकाउंट चेक केले असता त्यावर बरेच व्हिाडीओ असुन त्यापैकी एका व्हिडीओमध्ये “चाकु और चाकु का निशाण ये तुझे हम बतायेंगे जिस दिन बी तेरा नाम और पता चल जायेंगा ना मुखबीर ऊस दिन तेरा ३०७ बनायेंगे उमरखेड शहरमें” अशा वर्णनाची रिल्स मिळुन आले. त्याने मा. जिल्हाधिकारी सा. यवतमाळ यांचे आदेश क. गृहशाखा/डेस्क १२/कावि/२०४०/२०२४ दि.२०/०९/२०२४ लागु असताना दहशत पसरवण्याच्या ऊद्देशाने सदर आदेशाचे उल्लंघण केल्याने सदर इसमावर अप क ६५९/२०२४ कलम ३७(२), (३),१३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबात पुढील तपास बीट जमादार पोहवा राजुसिंग पवार ब.न १६८ पो स्टे उमरखेड करीत आहेत.,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here