Home महाराष्ट्र भ्रष्टचार चा बकासुर फोफावला.

भ्रष्टचार चा बकासुर फोफावला.

158

गंगाखेड:- गंगाखेड येथे दिनांक 1ओक्टंबर 2024 रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय गंगाखेड येथे लाचलुचपत विभागाच्या कारवाई केली असता महसूल सहाय्यकाला लाचेच्या रक्कमे सहित पकडला गेला. हि कार्यवाही गंगाखेड येथील शासकीय कार्यालयात पहिली नसून, या आधी तहसिल कार्यालय महसुल विभागातील मंडळ अधिकारी तसेच गंगाखेड नगर परिषद मध्ये तर पाच ते सहा वेळा लाचलुचपत विभागाच्या कारवाई करण्यात आल्या आहेत . तरी पण अशा करीवाहीला नघाबरता येथिल काही कर्मचारी तर नगरपरिषद म्हणजे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे समजून बिन्धास्त पणे कष्टकरी, गोरगरीब, अज्ञानी जनतेकडून लुटमार करत आहेत अशी चर्चा शहरातील जनते मध्ये चर्चा सुरू आहे. तसे पाहता या गोरगरीब, जनतेला तर कोणत्याही शासकीय कार्यालयात कोणत्याही कामास उदा. कुठले कागद पत्रे कडायचे असतील तर पैसे, लगेबाजी, किंवा दलाल मार्फत,गेले तर लवकर काम होतील, किंवा राजकीय आशीर्वाद असेल तरच ताबडतोब काम होतायत अशी चर्चा सामान्य जनतेत करताना दिसुन येते. परंतु सामान्य जनतेची कामे तहसिल कार्यालय, उप विभागीय अधिकारी कार्यालय,तसेच नगर परीषद कार्यालय या संबधित कार्यालयाशी कामे पडतात. या कार्यालयातील शासकीय अधिकारी यांनी जनतेच्या न्यायासाठी काम करणे हे अपेक्षित असते परंतु तसे दिसत नाही.गोरगरीब, जनता आपणास न्याय मिळेल अशी आशावाद ठेवून कार्यालयात चकरा मारतच असतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here