Home महाराष्ट्र कामगार नोंदणी व किट वाटप तालुका स्तरावर करा – पुजा ठवकर ...

कामगार नोंदणी व किट वाटप तालुका स्तरावर करा – पुजा ठवकर अन्यथा पालक मंत्र्यांचे घेराव करुन काळे झेंडे दाखवणार

158

 

रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 8888628986

भंडारा:-
सध्या भंडारा जिल्ह्यात कामगार कल्याण मंडळामार्फत नोंदीत कामगारांना किट व संसार उपयोगी साहित्य वाटप मागील आठ दिवसापासून चालू आहे. साहित्य घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व स्थानावरून कामगार भंडारा येथे येत आहेत. लाभार्थी कामगार साहित्य वाटप केंद्रावर रात्री ११.00 वाजता पासून तळ ठोकून बसतात‌ साहित्य वाटप केंद्रावर खाण्यापिण्याची कोणतीच व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे कामगारांचे कल्याण होण्याऐवजी बेहाल होत आहेत. चार दिवसापुर्वी साहित्य वाटप केंद्रावर चेंगराचेंगरी होऊन काही महीला कामगार जखमी झाल्या‌. पोलीसांनी बेकसूर कामगारांवर लाठीहल्ला केला. असे प्रसंग टाळण्यासाठी कामगार नोंदणी व साहित्याचे वाटप प्रत्येक तालुका स्तळावर करण्यात यावे. अन्यथा पालक मंत्र्यांचे घेराव करुन, काळे झेंडे दाखवुन, रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल.होणाऱ्या परिणामास कामगार अधिकारी व प्रशासन जबाबदार राहील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here