Home महाराष्ट्र निसर्गउपासक आदिवासींच्या वारली चित्रांतून संविधानिक मूल्यांच रेखाटन : मुक्ती महोत्सवात वारली...

निसर्गउपासक आदिवासींच्या वारली चित्रांतून संविधानिक मूल्यांच रेखाटन : मुक्ती महोत्सवात वारली चित्रकला प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

94

 

नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक -: मूळचा निसर्ग उपासक असलेला आदिम- आदिवासी समाज हा खऱ्या अर्थाने मानवी मूल्य जगत असून निसर्गतः उपलब्ध असलेल्या साधन स्रोतांचा वापर करून निसर्गाला पर्यावरणाला कोणतीही हानी न पोचविता आदिवासी कला संस्कृती जतन करत असल्याचे मत शैलेंद्र वाघ यांनी व्यक्त केले.
मूळच्या निसर्गउपासक आदिवासींच्या वारली चित्रांतून संविधानिक मूल्यांच रेखाटन करून
मुक्ती महोत्सवात वारली चित्रकला प्रशिक्षण कार्यशाळेत विद्यार्थ्यांकरवी प्रशिक्षण देण्यात आले.

भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी येवला येथील ऐतिहासिक मुंबई इलाका दलित वर्ग परिषद घेऊन धर्मांतराचे ऐतिहासिक घोषणा केली त्याला एकूण 89 वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्त येथे सुरू असलेल्या मुक्ती महोत्सवात वारली चित्रकला प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली त्यात भारतीय संविधानातील स्त्री पुरुष समता, पर्यावरण रक्षण,सामाजिक सलोखा, सामाजिक समता राष्ट्रीय एकता व एकात्मता, भारतीय संस्कृती विविधता ह्या भारतीय संविधानातील मूल्यांचे वारली चित्राच्या माध्यमातून रेखाटन करण्यात आले.

मुक्ती महोत्सवाचे निमंत्रक तथा प्रवर्तक शरद शेजवळ यांनी वारली चित्रकला प्रशिक्षण कार्यशाळेला मार्गदर्शन केले व प्रशिक्षणार्थींना वारली चित्रकलांचे प्रशिक्षण दिले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्तिभूमी वाचनालय तथा राष्ट्रीय महाकवी वामनदादा कर्डक मुक्तिभूमी अभ्यासिका येथे आयोजित वारली चित्रकला प्रशिक्षण कार्यशाळेच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शैलेंद्र वाघ हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून बापूसाहेब पगारे, संजय मिस्त्री,विनोद सोनवणे, सुधाकर गायकवाड हे मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तावित अधीक्षक बी.डी. खैरनार सर यांनी केले तर सूत्रसंचालन राजरत्न वाहुळ,आभार वसंत पवार यांनी मानले.
ह्या वेळी प्रशिक्षणार्थी म्हणून गायत्री खोकले, गायत्री गायकवाड राहुल गायकवाड, सिद्धार्थ गरुड, रवी गरुड, मानव जाधव, पवन खुरसने, हेमंत पवार, सार्थक पगारे, अमर जाधव, पंकज कुऱ्हाडे, निलेश अहिरे, करण ठाकरे, अजिंक्य पवार सत्यम धिवर, समीर ढामळे, गणेश बर्डे, संकेत पगारे आधी विद्यार्थी प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here