Home महाराष्ट्र समाजकल्याण उपायुक्तांना महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांचा उपोषणाचा इशारा.

समाजकल्याण उपायुक्तांना महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांचा उपोषणाचा इशारा.

17

नाशिक शांताराम दुनबळे
नाशिक -: आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा भिमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे व सहकाऱ्यांनी समाज कल्याण नाशिक विभागाचे उपायुक्त मा.माधव वाघ यांची भेट घेऊन विविध विषयाचे निवेदन देऊन उपोषणाचा इशारा दिला.
निवेदनाचा आशय असा आहे की नगर येथील सी एस आर डी समाजकार्य व अध्ययन ह्या संस्थेने मागासवर्गीय कर्मचारी वसंत कांबळे व शशिकांत हिवाळे ह्यांना बेकायदेशीर निलंबन केल्याने संस्था बडतर्फ करुन प्रशासक नेमण्यात यावा, मुखेड तालुका येवला जिल्हा नाशिक येथील सत्याग्रही स्मारकाचे काम त्वरित पुर्ण करण्यात यावे अन्यथा शेकडो कार्यकर्ते समाज कल्याण कार्यालयासमोर उपोषण करून राज्यभर आंदोलन करतील याची दखल घ्यावी.
याप्रसंगी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा भिमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगर जिल्हा सरचिटणीस वसंत दादा कांबळे, जिल्हा नेते ज्ञानेश्वर कांबळे, युवा नेते प्रशांत (वस्ताद) गांगुर्डे, नगर जिल्हा संघटक महेश गवळी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

अशी माहिती भिमटोला सामाजिक संघटनेचे प्रसिध्दी प्रमुख प्रतीक सोनटक्के यांनी प्रसिद्धीप्रञकाद्वारे दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here