Home यवतमाळ उमरखेड येथे आदिवासी आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन

उमरखेड येथे आदिवासी आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन

199

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दिनांक ०२ ऑक्टोंबर) भारतीय स्वातंत्र्याचा ७५ वर्षा नंतरही आदिवासीचे जीवन मरणाचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत त्याच अनुषंगाने आदिवासी आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

उमरखेड येथे आदिवासी आरक्षण बचाव मोर्चाच्या आयोजन आज दिनांक आज दिनांक २ ऑक्टोंबर २०२४ रोजी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेण्यात आली.

यावेळी आदिवासी आरक्षण बचाव मोर्चाचे अध्यक्ष सचिव पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी विविध विषयावर पत्रकार बांधवांसोबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी आदिवासी आरक्षण बचाव मोर्चाचे आयोजन दिनांक ४ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजताच्या दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती उमरखेड येथून मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्यानिमित्ताने आदिवासी कृती समिती व समस्त आदिवासी समाज बांधवांना मोर्चा सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आणि यावेळी कृती समितीचे अध्यक्ष उत्तम पांडे कार्याध्यक्ष प्रकाश शिकारे, उपाध्यक्ष बालाजी लांडगेवाड, सचिव धनवे, सहसचिव अनिल ठाकरे, कोषाध्यक्ष नामदेव मुरमुरे, संघटक सदानंद पांडे, मार्गदर्शक देविदास खोकले, विठ्ठल खूपसे, कैलास गारोळे, देविदास मुखाडे, प्रसिद्धी प्रमुख निलेश पिलवंड, अरुण बुरकुले या सर्व पदाधिकारी समाज बांधवांनी जास्तीत जास्त समाज Attaching मोर्चामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here