✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड : येथील एसटी बस
स्थानक येथे कर्मचाऱ्यांनी ‘स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता’ या उपक्रमांतर्गत या भावनेने प्रेरित होऊन येथील एसटी महामंडळातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या पंधरवड्यात आपला परिसर स्वच्छ राहावे म्हणून ३० सप्टेंबर रोजी सकाळी संपूर्ण बस स्थानक परिसर स्वच्छ मोहीम राबविण्यात आले.
या मोहिमेत एसटी महामंडळातील सर्व कर्मचारी अधिकारी कामगार मेकॅनिक यांनी एकजुटीने एसटी महामंडळ बस स्थानक आगार अशा ठिकाणच्या स्वच्छतेसाठी श्रमदान केले.
बस स्थानक परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी डस्टबिनही लावण्यात आले स्वच्छता ही सेवा २०२४ अभियान १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर कालावधीत देशभरात राबविण्यात येत आहे.
स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता उपक्रम स्वच्छतेसाठी श्रमदान सोबत आपलेबस स्थानक व आगार स्वच्छ करून स्वच्छतेची कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली व स्वच्छतेची प्रक्रिया अखंडपणे सुरू राहावी आणि आपले एसटी बसेस वर्कशॉप बस स्थानक स्वच्छ करण्याच्या या अभियानात सर्व कर्मचारी अधिकारी सहभागी व्हावे असा
संदेशही दिला तसेच आपला आगार स्वच्छ देशाच्या यादीत राहील असेही सांगण्यात आले.
यावेळी आगार प्रमुख श्रीमती प्रमोदिनी किनाके, कार्यशाळा अधीक्षक प्रकाश भदाडे, गोविंद चनेबोईनवाड, सह सर्व चालक वाहक मेकॅनिक
कामगार सदर मोहिमेत उपस्थित
होते.