✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड :- (दिनांक १ ऑक्टोंबर) दि.२३ सप्टेंबर रोजी महायुती सरकारने ब्राह्मण समाजास भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ दिल्याची घोषणा मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये केली.
महायुती सरकारने केलेल्या या घोषणेमुळे ब्राह्मण समाजामध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. भगवान परशुराम आर्थिक विकास महामंडळ ब्राह्मण समाजाला मिळावे याची मागणी अनेक वर्षापासून सकल ब्राह्मण समाजाची होती.
मागील काही काळात सर्व समाजाला आर्थिक महामंडळ महायुती सरकारने दिली. परंतु ब्राह्मण समाजास काही दिले नाही. म्हणून ब्राह्मण समाजात नाराजीचा सूर उमटत होता की महायुती सरकारने दुर्लक्षित केले आहे. आणि ब्राह्मण समाजासाठी काही केले नाही. म्हणून ब्राह्मण समाजातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आपापल्या परीने व अनेक संघटनांनी आंदोलने केली व उपोषणे केली. व ब्राह्मण समाजाच्या मागणीकडे सरकारचे लक्ष वेधून घेतले.
हे सर्व पाहता महायुती सरकारने विचार करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ब्राह्मण समाजास परशुराम आर्थिक विकास महामंडळ प्रस्ताव बैठकीमध्ये मांडताच सर्वांनी एक मताने मंजुरी दिली. ही बातमी बाहेर येताच ब्राह्मण समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. याचाच भाग म्हणून उमरखेड येथील ब्राह्मण समाजाचा वतीने आभार कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी अध्यक्ष स्थानी ब्राह्मण समाजाचे माजी अध्यक्ष एम डी पांडे, कृषी अधिकारी सुनील देशपांडे, माजी नगरसेवक चंद्रकांत भानेगावकर व पत्रकार स्वप्निल मगरे, विजय आडे हे उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक देशमुख यांनी केले.
यावेळेस अशोक चौधरी, राजाभाऊ देशपांडे, सुनील वानरे, मनोज पोटे संतोष देव, बंडू पाध्ये असंख्य ब्रह्मरुंद उपस्थित होते.