कराड :(दि. 30, प्रतिनिधी) वेणूताई चव्हाण कॅालेज, कराड
अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने “एस. ए. पी. व डिजिटल मार्केटिंग ओळख” या विषयावर परिसंवाद पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री अमरज्योती शिंदे (सेंटर मॅनेजर, जी-टेक) हे उपस्थित होते. एस ए पी प्रणाली ही एक जर्मन कंपनीद्वारे विकसित करण्यात आलेली प्रणाली असून बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये ती वापरली जाते. व्यवसायातील सर्व विभागातील सर्व नोंदी या प्रणाली अंतर्गत नोंदवल्या जातात. वाणिज्य पदवीधर विद्यार्थ्यांना एस ए पी प्रणालीतील फायनान्स आणि मटेरियल मॅनेजमेंट या दोन विभागात भरपूर संधी उपलब्ध होत आहेत. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रभारी प्राचार्य प्रा. (डॉ.) एस. आर. सरोदे उपस्थीत होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभाग प्रमुख श्रीमती एस. सी. भस्मे यांनी केले.
पाहुण्यांचा परिचय प्रा. व्ही. पी. धुमाळ यांनी करून दिला तर श्रीमती एम. एम. चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन प्रा. एम. एस. बागवान यांनी केले. सदर कार्यक्रमास वाणिज्य विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.