Home यवतमाळ बांधकाम कामगारांना साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात गोंधळ (कर्मचारी वेळेवर येत नसल्याचा संध्या...

बांधकाम कामगारांना साहित्य वाटपाच्या कार्यक्रमात गोंधळ (कर्मचारी वेळेवर येत नसल्याचा संध्या रणवीर यांचा आरोप)

82

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दिनांक ३० सप्टेंबर) तालुक्यातील तसेच महागाव तालुक्यातील बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उमरखेड येथील नप अनंतराव देवसरकर सभागृहामध्ये सकाळी ६ वाजल्यापासून लाईन मध्ये उभे आहेत.
परंतु कर्मचारी १ वाजता आले आहे. असे मत लाभार्थी तसेच संध्या रणवीर यांनी केला आहे.

त्याच बरोबर कामगाराची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत असून काही महिलांच्या हातातून रक्त येत असून त्यांच्याकडे कोणीही बघत नाही असे संध्याताई रणवीर म्हणाल्या होत्या.

यावेळी नागरिकांना उभे राहण्यासाठी सावलीची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नाही त्यामुळे लाभार्थ्यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत होता.

या विषयी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महागाव तालुका अध्यक्षा संध्या रणवीर यांनी कर्मचारी यांना विचारणा केली असता. कर्मचारी रणवीर यांना आवाज वाढवू नका अश्या भाषेत बोलत होते.

मागील ५ वर्षापासून बंद असलेली योजना निवडणुकीच्या तोंडावर अचानक कशी सुरू झाली असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here