Home यवतमाळ जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम (उमरखेड तालुका औषध विक्रेता संघटनेचे...

जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम (उमरखेड तालुका औषध विक्रेता संघटनेचे आयोजन)

54

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड (दिनांक ३० सप्टेंबर) तालुका औषध विक्रेता संघटनेच्यावतीने जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त उमरखेड येथे २५ सप्टेंबरला औषध जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी शहरात वृक्षारोपणासह विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

उमरखेड तालुका व शहर औषधी विक्रेता संघटने तर्फे जागतीक फार्मसिस्ट दिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद मुलांच्या शाळेत सकाळी वृक्षारोपण करण्यात आले.
औदुंबर वृक्ष समितीच्या मदतीने काही औषधी जनक वड, निंब
वृक्षांची लागवड करून वृक्ष संवर्धनाची हमी समितीने दिली. वृक्षांचे रक्षण व्हावे, या हेतूने औदुंबर वृक्ष समितीकडे वृक्षगार्डसाठी देणगी देण्यात आली. तसेच संघटनेकडून मागील वर्षी जागतीक फार्मासिस्ट दिनानिमित्त झाडे लावली होती. ती झाडे सुरक्षित संवर्धन करून त्या झाडांना सजवून पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. शासकिय रूग्णालयाच्या प्रांगणात राष्ट्रगीत व फार्मासिस्ट ओथ घेण्यात आली.

येथील शासकिय उत्तरवार रूग्णालयात रूग्णांना फळ वाटप करण्यात आले. त्यानंतर शहरात दुचाकीने अतिशय शिस्तप्रिय व शांततेत औषधी जन जागृती रॅली काढण्यात आली. शासकीय रुग्णालय, नगरपरिषद, सोनार गल्ली, नाग चौक मार्गे संजय गांधी चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.फार्मसिस्ट समाजासाठी कसा महत्वूर्ण आहे असे दर्शविणारे फलक दाखविण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते.

उमरखेड येथील श्री शिवाजीराव मोघे निवासी मतीमंद शाळेत मुलांना फळ, खाऊ, स्वीट,औषधी, वाटप करण्यात आली. तसेच औषधी विक्रेता संघटनेकडून शाळेचे मुख्याध्यापक यांना प्रथोमोपचार पेटी व विविध उपयोगी औषधी देण्यात आली.

फार्मासिस्ट दिनानिमित्ताने सर्व फार्मासिस्ट यांनी त्यांच्या मेडिकल वर येणाऱ्या रुग्णास औषधी बद्दल योग्य समुपदेशन दिले.

यावेळी उमरखेड तालुका व शहर औषधी विक्रेता संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here