भारताचा शेजारी देश असलेल्या श्रीलंकेत नुकतेच सत्तांतर झाले असून तिथे डाव्या विचासरणीचे अनुरा कुमार दिसनायके हे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. श्रीलंकेत नुकतीच निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीत विमुक्त पेरामुना या राजकीय पक्षाला बहुमत मिळाले. श्रीलंकेत याआधी कधीही या पक्षाला बहुमत मिळाले नव्हते यावेळीही या पक्षाला बहुमत मिळेल असे कोणाला वाटले नव्हते कारण विद्यमान राष्ट्राध्यक्ष रानील विक्रमसिंघे आणि माजी राष्ट्राध्यक्ष राजपक्षे गोटाबाया यांच्या पक्षात मुख्य लढत होती आणि या दोन पक्षापैकीच एका पक्षाचा विजय होईल असा कयास व्यक्त केला जात होता मात्र हा कयास फोल ठरवत दीसनायके यांनी करिश्मा करत आपली सत्ता आणली. श्रीलंकेसाठी हे सत्तांतर महत्वाचे ठरणार आहे कारण गेल्या दोन वर्षात श्रीलंकेत अनेक घडामोडी घडल्या. दोन वर्षापूर्वी म्हणजे २०२२ मध्ये श्रीलंकेत जनतेनेच उठाव करून तेंव्हाचे श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष राजपक्षे गोटाबाया यांना देशातून हाकलून लावले होते. राजपक्षे गोटाबाया यांच्या नंतर त्यांची जागा विरोधी पक्षाचे नेते रानिल विक्रमसिंघे यांनी घेतली. या दोघांनी नेहमीच आलटून पालटून श्रीलंकेची सत्ता उपभोगली पण या दोन्ही नेत्यांविषयी जनतेच्या मनात नाराजी होती कदाचित हीच नाराजी श्रीलंकन जनतेने मतपेटीतून व्यक्त करून तिसरा पर्याय निवडला. श्रीलंकन जनतेने निवडलेला हा तिसरा पर्याय भारतासाठी मात्र डोकेदुखी ठरू शकतो कारण दिसनायके यांचा विमुक्त पेरामुना हा पक्ष डावी विचारसरणी मानणारा पक्ष आहे आणि या पक्षाचे चीनशी सौहार्दाचे संबंध आहेत. खुद्द दिसनायके हे चीन समर्थक मानले जातात. त्यांनी अनेकदा चीनची उघडपणे बाजू घेतली आहे आणि भारतासाठी हीच चिंतेची बाब आहे. पाकिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ ही भारताची शेजारी राष्ट्रे ही या आधीच पाकिस्तानच्या आधीन गेली आहेत त्यात आता श्रीलंकेची भर पडणार आहे. श्रीलंकेची जर चीनशी सलगी वाढली तर हिंद महासागरात भारताच्या वर्चस्वाला धोका पोहचू शकतो. भारत विरोधी कारवाया करण्यासाठी चीन श्रीलंकेचा वापर करू शकतो त्यामुळे भारताने श्रीलंकेबाबत आता अधिक सजग राहावे लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे दिसनायके यांनी श्रीलंकेतील तमिळ चळवळीला कायम विरोध केला आहे. भारत श्रीलंकेतील तमिळ चळवळीला प्रोत्साहन देत असून तमिळ नागरिकांच्या स्वतंत्र राष्ट्राच्या मागणी मागे भारताचा आरोप असल्याचा आरोप त्यांनी याआधी केलेला आहे. एकंदरीत श्रीलंकेतील सत्तांतर भारतासाठी डोकेदुखी ठरणारे आहे. अर्थात सत्तेवर येताच दिसनायके यांनी भारताशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचे वक्तव्य केले ही समाधानाची बाब आहे. २०२२ मध्ये श्रीलंकेत जेंव्हा उठाव झाला तेंव्हा भारतानेच त्यांना आर्थिक मदत केल्याचे त्यांनी सांगितले असून त्यांनी त्यासाठी भारताचे आभारही मानले आहे हे जरी खरे असले तरी चीन त्यांना कधी आपल्या फाशात अडकावेल हे सांगता येत नाही.
श्याम ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५