रोशन मदनकर, उपसंपादक, मो. 8888628986
भंडारा:-
येथील गनेशपुरच्या गणपतीचे दि. 21 सप्टेंबर, शनिवारी पुढच्या वर्षी लवकर या, गर्जना करीत भाव अंतःकरणाने विसर्जन करण्यात आले. वाजत-गाजत, ढोल-ताशांच्या गजरात आगमन झालेल्या गनेशपुरच्या पंचवीसमुखी बाप्पांनी शनिवारला भक्तांचा निरोप घेतला. या वेळी भंडारा शहरातील भाविकांनी निरोप असल्याने अखेरच्या सेल्फीसाठी अनेक धडपड सुरू केली होती. काहींनी बाप्पाच्या आरतीच्या वेळी तर काहींनी अगदी सूर्यास्ताच्या क्षणी किनाऱ्यावर अखेरचा निरोप देताना सेल्फी स्टिक घेऊन तो क्षण आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त केला. यात सायंकाळी 4 वाजल्यापासूनच अनेक रस्त्यांवर मोटासायकलस्वार,टॅक्सी, टेम्पो, रिक्षा, कारमध्ये बसून भाविकांनी बाप्पाचा दर्शन घेऊन निरोप घेतला. पोलिसांनीही ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवत कोणताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेतली. भाविकांकडून गणपती बाप्पा मोरया ‘पुढच्या वर्षी लवकर या’ असा निरोप देत विसर्जन करण्यात आले.
—————————
*मिरवणुकीचे विशेष आकर्षण*
राज धुमाळ दुर्ग,नाशिक ढोल ताशा पथक , भस्म तांडव ग्रुप हरियाणा, महाकाली नृत्यगृप राजनांदगाव , वारकरी संप्रदाय भजन मंडळ बेटाळा, लाकडी घोडा झांकी मासळ, डफळी वाद्य मंडळ बेटाळा, अष्टविनायक फायर इव्हेंट भंडारा अश्या प्रकारे आकर्षक मिरवणूक शहरातून काढण्यात आली.