मोर्शी तालुका प्रतिनिधी : महानुभावपंथीयांची काशी, गोविंदप्रभू यांचे देवस्थान व मराठी भाषेचे जन्मस्थळ असलेल्या श्रीक्षेत्र रिद्धपूरच्या विकासासाठी स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांनी मागील 4 वर्षापासून सतत पाठपुरावा करून प्रशासनाच्या विविध बैठकांचे आयोजन करून शासनाकडे तीर्थक्षेत्र विकास आराखडा सादर केल्यामुळे आमदार देवेंद्र भुयार यांच्या मागणीची दखल घेऊन राज्य शासनाने तीर्थक्षेत्र रिद्धपूर विकास आराखड्यास शिखर समितीची मंजूरी प्रदान करून 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती आमदार देवेंद्र भुयार यांनी दिली.
तीर्थक्षेत्र रिद्धपूर विकास आराखड्यास
शिखर समितीची मंजुरी 25 कोटी रुपयांची
वित्तिय मान्यता प्राप्त करण्यात आली असून यामध्ये रिद्धपूर तीर्थक्षेत्रातील तळमजल्याचे बांधकाम करणे, पहिला माळा बांधकाम करणे, बसस्थानक व सभागृह बांधकाम करणे, वाचनालय आणि अभ्यासिका बांधकाम करणे, प्रसाधन गृह बांधकाम करणे, पिवळविहीर येथे सभागृहाचे बांधकाम करणे, पाणीपुरवठा, विद्युतीकरण अग्नीशमण व्यवस्था इ. निर्माण करणे, पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर, सौर उर्जा, दिव्यांगांसाठी रैंप व फर्निचर आदी कामे करणे, संरक्षण भिंत बांधकाम करणे, अंतर्गत रस्ते करणे, प्रवेश द्वार निर्माण करणे, जमिनीखालील पाण्याची टाकीचे बांधकाम, पाण्याची टाकी व पंप हाऊस यासह विविध कामांना मंजूरी प्रदान करण्यात आली असून या सर्व कामांसाठी राज्य शासनाने 25 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिल्याबद्दल आमदार देवेंद्र भुयार यांनी राज्य शासनाचे आभार मानले.
आमदार देवेंद्र भुयार यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे रिद्धपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मान्यता मिळाल्यामुळे श्री. वाईंदेशकर बाबा, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दत्ता ढोमने, गोपाल जामठे, रिद्धपूर येथील सरपंच उपसरपंच ग्राम पंचायत सदस्य, तात्यासाहेब मेश्राम, पंकज हरणे, यांच्यासह आदी मंडळींनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार देवेंद्र भुयार यांचे आभार मानले.