Home यवतमाळ वणीत आंतरमहाविद्यालयीन व्हाॅलिबॉल स्पर्धेत कळंब येथील इंदिरा महाविद्यालयाचा संघ ठरला विजेता

वणीत आंतरमहाविद्यालयीन व्हाॅलिबॉल स्पर्धेत कळंब येथील इंदिरा महाविद्यालयाचा संघ ठरला विजेता

144

 

 

 

वणी (दि.21 सप्टेंबर )- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या वणीतील आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल (बी झोन) स्पर्धेत कळंब येथील इंदिरा महाविद्यालयाची चमू विजेता झाली तर अमरावतीच्या डॉ. राजेन्द्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीची चमू उपविजेता ठरली.

शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या वतीने वणी येथे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे आयोजन शासकीय क्रीडा मैदानावर करण्यात आले.
या स्पर्धेचे उद्घाटन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार यांचे हस्ते झाले. या स्पर्धेत डॉ.राजेन्द्र गोडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी(अमरावती), इंदिरा महाविद्यालय (कळंब), शिवरामजी मोघे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय (केळापूर), श्रीमती नानकीबाई वाधवाणी कला महाविद्यालय (यवतमाळ), इंदिरा गांधी कला महाविद्यालय (राळेगाव) या महाविद्यालयाच्या व्हाॅलिबॉल संघांनी सहभाग घेतला.
अंतिम सामन्यानंतर विजेत्या इंदिरा महाविद्यालयाच्या संघाशी वणीच्या संस्कार क्रीडा क्बलच्या संघाने सरावाचा सामना करून आपल्या खेळाचे प्रदर्शन दाखवले.
स्पर्धेनंतर लगेच पारितोषिक वितरण सोहळा झाला. उद्घाटन व पारितोषिक वितरण समारंभात शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार
सचिव सुभाष देशमुख, सहसचिव अशोक सोनटक्के यांचेसह कार्यकारिणी सदस्य उमापती कुचनकार, नरेंद्र ठाकरे, अनिल जयस्वाल, नरेश मुणोत, सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग कवरासे, प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे , प्राचार्य डॉ. सुधाकर रेड्डी, उपप्राचार्य प्रा. पुरुषोत्तम गोहोकार, मुख्याध्यापक प्रमोद क्षीरसागर स्पर्धेचे संयोजक प्रा.उमेश व्यास हे मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेत महेश भोयर,सचिन डोंगरे, फैजान खान, निखिल ठाकरे, अंकित क्षीरसागर हे पंच होते. विविध महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा. शितल एस. राऊत (कळंब), डॉ.किरण पवार (राळेगाव), प्रा.सौरभ माकडे (घाटंजी), डॉ.व्ही.आर.चव्हाण (केळापूर), प्रा.धनश्री भगत (अमरावती), प्रा.नितू शेंडे (यवतमाळ) यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व्हाॅलिबॉल चमू स्पर्धेत सहभागी झाल्या.
उद्घाटन व पारितोषिक समारंभाचे सूत्रसंचालन आणि स्पर्धेचे समालोचन डॉ.मनोज जंत्रे यांनी केले. प्रा.उमेश व्यास यांनी आभार मानले.
संतोष बेलेकर, जगदीश ठावरी,रूपेश पिंपळकर, सुरज कडूकर, प्रा.राजेन्द्र कोठारी, डॉ. गुलशन कुथे, प्रा.महादेव भुजाडे, प्रा.आनंद हूड, डॉ.आदित्य शेंडे, पंकज सोनटक्के, जयंत त्रिवेदी यांचेसह संस्कार क्रीडा मंडळ आणि लोकमान्य टिळक महाविद्यालयातील खेळाडू, राष्ट्रीय छात्रसेनासैनिक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.
———————————————-

*निकोप स्पर्धा, सराव आणि सहकार्य आवश्यक-विजय मुकेवार*

वणी परिसराला मोठी क्रीडा संस्कृती लाभली आहे. मैदानावर खेळणाऱ्या खेळाडूंनी वणीची क्रीडा संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. निकोप स्पर्धा, नियमित सराव आणि सहकार्याची भावना यांमुळे खेळाडू यशस्वी होत असतो.” असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार यांनी पारितोषिक वितरण समारंभात केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here