Home चंद्रपूर शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातील विद्यार्थी विदयापीठ स्तरीय क्रीडा स्पर्धेत विजयी

शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयातील विद्यार्थी विदयापीठ स्तरीय क्रीडा स्पर्धेत विजयी

69

 

चिमूर -स्थानिक शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय येथील विद्यार्थी यांनी गोंडवाना विदयापीठ स्तरीय विविध क्रीडा स्पर्धेत यश प्राप्त केले.दि. 13 व 14 सप्टेंबर 2024 रोजी एफ ई एस महाविद्यालय चंद्रपूर येथे अंतर महाविदयालयीन बुद्धिबळ स्पर्धा मुलीनं साठी आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील अनेक मुलींच्या चमुने भाग घेतला होता. या स्पर्धेत विधी महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. सावि भेसेकर, मयुरी लखमापूरे, आचल वाढई, रोजा खान पठाण, ऋतुजा रामटेके या विद्यार्थी निने सहभागी होऊन दुसऱ्या क्रमांक पटकवला आहे. या सर्व विजयी विद्यार्थिनींचे महाविद्यालायचे प्राचार्य डॉ. ऐजाज शेख, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. सरोज कुमार दत्ता यांनी हार्दिक अभिनंदन केले व पुढील यश प्राप्तीच्या शुभेच्छा प्रदान केल्या. महाविद्यालयाचे डॉ. सरोज कुमार दत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थिनीने हा विजय पटकावला आहे. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विजेत्यांचे मनः पूर्वक अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here