Home महाराष्ट्र वणी येथे विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे आयोजन ! २० सप्टेंबरला...

वणी येथे विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे आयोजन ! २० सप्टेंबरला थाटात होणार उद्घाटन समारोह संपन्न !

97

 

मोर्शी तालुका प्रतिनिधी :-
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेचे (बी झोन ) आयोजन शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालयाच्या वतीने वणी येथे केले आहे. ब विभागातील (बी झोन) यवतमाळ व अमरावती जिल्ह्यातील बारा तालुक्यातील महाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल संघ या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
वणी येथील शासकीय क्रीडा मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन २० सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजय मुकेवार यांचे हस्ते होईल.यावेळी उपाध्यक्ष नरेंद्र बरडिया, सचिव सुभाष देशमुख, सहसचिव अशोक सोनटक्के यांचेसह कार्यकारिणी सदस्य उमापती कुचनकार, नरेंद्र ठाकरे,अनिल जयस्वाल, नरेश मुणोत, ओमप्रकाश चचडा, विनायकराव तत्त्वादी, सुरेश शुक्ल,माजी आमदार विश्वास नांदेकर, प्राचार्य डॉ. प्रसाद खानझोडे , प्राचार्य डॉ सुधाकर रेड्डी, उपप्राचार्य प्रा. पुरुषोत्तम गोहोकार, मुख्याध्यापक प्रमोद क्षीरसागर,जगदीश ठावरी, स्पर्धेचे संयोजक प्रा.उमेश व्यास हे मान्यवर उपस्थित राहतील.
यवतमाळ,मुळावा,बोरीअरब,, उमरखेड, केळापूर, दारव्हा, घाटंजी,मारेगाव, राळेगाव, आर्णी, कळंब, अमरावती येथील विविध महाविद्यालयातील सुमारे चोवीस व्हॉलीबॉल संघ या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
या आंतरमहाविद्यालयीन महिला व्हाॅलिबॉल स्पर्धेकरिता लोकमान्य टिळक महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण व क्रीडा संचालक प्रा.उमेश व्यास, डॉ. मनोज जंत्रे,रूपेश पिंपळकर,जगदीश ठावरी, संतोष बेलेकर यांचेसह संस्कार व्हॉलीबॉल क्लबचे खेळाडू व लोकमान्य टिळक महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि क्रीडा व शारिरीक शिक्षण विभागाचे विद्यार्थी
परिश्रम करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here