अहमदनगर (प्रतिनिधी) *शब्दगंध साहित्यिक परिषद, महाराष्ट्र राज्य च्या वतीने राज्यस्तरीय प्रेम काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त नवोदित कवींनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा,असे आवाहन शब्दगंध चे संस्थापक, सचिव सुनील गोसावी व अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी केले आहे*.
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले, स्वलिखित दोन कविता, परिचय, फोटो व शुल्क रुपये 100 दि. ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत पाठवावे. अधिक माहितीसाठी shabdgandh2018@gmail.com या ईमेल वर पुर्ण नाव व पत्ता असलेल्या कविता पाठवून नोंदणी करता येईल.कविता टेक्स्ट मेसेज स्वरूपात किँवा पीडीएफ जास्तीत जास्त २० ओळींची असावी.सामाजिक प्रेम, नैसर्गिक प्रेम, कौटुंबिक प्रेम, आई-बाप प्रेम, प्रियकर – प्रियसी प्रेम अशा आशयाच्या प्रेम कविता स्वागतार्ह असून जातीयवादी, राजकीय विडंबन, व्यक्ती चारित्र्यहनन करणा-या कविता पाठवू नये. काव्यलेखन स्पर्धेचा निकाल वर्तमानपत्रात प्रसिद्ध केला जाईल. मात्र काव्यलेखन स्पर्धेतील पारितोषिक प्राप्त कवींनी प्रत्यक्ष हजर राहून पारितोषिक स्वीकाराव लागेल,पोस्टाने पाठविल जाणार नाही.याची नोंद घ्यावी. स्पर्धेतील विजेत्यांना *प्रथम (एक) रु. १००१/- + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र*
*व्दितीय (एक) रु. ७५१/- + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र*
*तृतीय- (एक) रु. ५५१/- + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्र* *उत्तेजनार्थ (दोन) – प्रत्येकी २५१/- + सन्मानचिन्ह + प्रमाणपत्रमानपत्र*
*परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.*
अधिक माहितीसाठी – *सुनील गोसावी, संस्थापक, सचिव ९९२१००९७५०*
तरी या प्रेम काव्य लेखन स्पर्धेत जास्तीत जास्त कवींनी सहभागी व्हावे, असे आवाहन शब्दगंध चे संस्थापक सचिव सुनील गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे, खजिनदार भगवान राऊत, कार्याध्यक्ष डॉ. अशोक कानडे, भारत गाडेकर,राजेंद्र फंड, सुभाष सोनवणे, शर्मिला गोसावी, स्वाती ठूबे, बबनराव गिरी, अजयकुमार पवार,डॉ.तुकाराम गोंदकर, सुनील धस, राजेंद्र पवार, प्राचार्य डॉ.गुंफा कोकाटे, राजेंद्र चोभे यांनी केले आहे.