बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855
पुसद- पाथरवाडी आणि नागवाडी या दोन्ही गावांना महसूल दर्जा देण्यात यावा यासाठी सदो पुसद आणि तहीलदार यांना निवेदन देण्यात आले.
पाथरवाडी आणि नागवाडी या दोन्ही गावांना महसूल दर्जा मिळावा म्हणून मागील 15 वर्षा पासून गावकरी निवेदन देत आहेत, परंतु आज पर्यंत प्रशासनाने यांची मागणी पूर्ण केली नाही. एकच मागणी वारंवार करून गावकरी त्रस्त झालेली आहेत. गावकऱ्यांनी या निवेदनातून प्रशासनाला रस्त्यावर उतरणान्याचा इशारा दिलेला आहे. वेळप्रसंगी आंदोलने, उपोषणे करून हक्क आणि अधिकार मिळवून घेऊ, असा गावकऱ्यांनी चंग बांधलेला आहे.
यापूर्वीही पाणी प्रश्नासाठी पाथरवाडी च्या गावकऱ्यांनी आमरण उपोषण केले होते. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी सर्व गावकरी पायदळ निघाले होते. परत आंदोलन करण्याची गरज प्रशासनाने येऊ देऊ नये. पाथरवाडी नागवाडी हे गाव शंभर टक्के आदिवासी असून पूर्वी पार जंगलामध्ये राहत आहेत.या गावांना महसुली दर्जा नाही. नागवाडी आणि पाथरवाडी या दोन्ही गावामधे 100% आदिवासी आंध जमातीचे लोक राहतात.यांचे वास्तव्य पूर्णपणे जंगलामध्ये असून सुद्धा त्यांना डोंगरी प्रकल्प मार्फत कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नाही. मूलभूत सोय सुविधांपासून आणि इतर बऱ्याच नागरी सुविधा पासून दोन्ही गावे वंचित आहेत.सध्या सदर दोन्ही गावे गट ग्रामपंचायत शिळोणा अंतर्गत येतात. शिळोणा गावापासून पाच किमी अंतरावर ही गावे आहेत.अंतर जास्त असल्यामुळे मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासनाने तात्काळ दाखल घेऊन या दोन्ही गावांना महसुली दर्जा द्यावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
यावेळी निवेदनासाठी दोन्ही गावचे नागरिक मुंगसाजी मोरे, देविदास लेकुरवाळे, श्रावण कुरकुटे, वैभव कुरकुटे, दत्ता बोलके, आदिनाथ मोरे, विष्णू कुरकुटे, अविनाश कुरकुटे, योगेश कुरकुटे, श्रीकांत मार्कड, रविंद्र नांदे, संदीप आढाव,वंचित बहुजन आघाडीचे बुद्धरत्न भालेराव, जयानंद उबाळे, यशवंत कोल्हे, मधुकर सोनवणे, गोवर्धन भालेराव उपस्थित होते.