बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855
गंगाखेड :-इस्लाम धर्मात, ‘ईद-ए-मिलाद-उन-नबी’ हा सण रबिउल अव्वलच्या महिन्यात ईद ए मिलादुन्नबीच्या दिवशी साजरा केला जातो.हा दिवस मुस्लिम बांधवांसाठी अतिशय खास असुन या दिवशी इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्म झाला होता, इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांची जयंती ईद-ए-मिलाद म्हणून साजरी केली जाते.
मोहम्मद पैगंबर हे अल्लाहचे अंतिम प्रेषित होते. इस्लाम धर्माच्या मान्यतेनुसार अल्लाहने त्यांच्यामार्फत कुराण हा धर्मग्रंथ लोकांपर्यंत पोहोचवला. त्यामुळे त्यांना नबी, रसूल आदी नावांनीही संबोधित केले जाते. इस्लाममध्ये ईद-ए-मिलाद हा सर्वांत मोठा दिवस असल्याचे मानले जाते. परंतु गणपती उत्सव सुरु असल्याने १६सप्टेंबर ऐवजी
गंगाखेड शहरात १९ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी करण्यात आलीया जुलूस मध्ये लहान मुला बाळासहित वरिष्ठांनी सहभाग नोंदवून एकमेकाच्या गळा भेट घेत शुभेच्छा दिल्या तसेच शहरातील राजकीय पुढाऱ्या सहित पोलिस प्रशासनाच्या वतीने मुस्लीम बांधवांचे स्वागत करण्यात आले ठीक ठिकाणी सरबत व फळांचे स्टॉल लावण्यात आले होते व मराठा समाज बांधवांच्या वतीने फळाचे वाटप करण्यात आले. यानिमित्त शहरातील जैदीपुरा येथून जुलूस काढण्यात आला दिलकश चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, चांद तारा चौक मार्गे रजा मस्जिद या ठिकाणी सांगता करण्यात आली. पोलिस प्रशासनाच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता.