✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
राळेगाव (दिनांक १८ सप्टेंबर) गाववलीनगर येथे समाज बांधवांशी सामाजिक विषयावर सविस्तर चर्चा करून भीम टायगर सेना महिला आघाडी ची शाखा स्थापन करण्यात आली.
ज्वलंत आंबेडकरवादाचा पुरस्कार करणार लढाऊ, वैचारीक व आक्रमक असलेल अराजकीय सामाजिक संघटन. “प्यार का जवाब प्यार से वार का जवाब तलवार से” हे ब्रीदवाक्य घेऊन भीम टायगर सेना समाजातील लोकांवर होणारे अन्याय अत्याचार ला वाचा फोडण्यासाठी काम करणारे एकमेव अराजकीय सामाजिक संघटन आहे. राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके यांच्या आदेशानुसार संपूर्ण संघटन जोमाने काम करत आहेत.
यावेळी भीम टायगर सेना यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष गोपीचंदजी ढाले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत तालुकाध्यक्ष प्रविण ऊर्फ पिंटू कांबळे,अजय दारुडे, दसोडे साहेब, बबलू ताकसांडे व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
कांचन ताकसांडे यांची शाखा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली असून उपाध्यक्ष पदी वनिता राऊत तर सचिव पदी वर्षा ताकसांडे, आणि प्रियंका ताकसांडे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
तर सदस्य म्हणून वनिता कांबळे, संजीवनी ताकसांडे, प्रभा ताकसांडे, वंदना ताकसांडे, सुशीला ताकसांडे, दीक्षा ताकसांडे, शोभा भगत, बेबीबाई ताकसांडे, रेखाबाई ताकसांडे, जया ताकसांडे या सर्वांची निवड एकमताने करून भीम टायगर सेना महिला शाखा कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
जिल्ह्यातून सर्व स्तरावर निवड झालेल्यांची सर्व पदाधिकाऱ्यावर शुभेच्छांचा वर्षाव होता दिसत आहे.