Home यवतमाळ पशु पक्ष्यांचे बळी देण्यासाठीच “संविधान मंदिराची” उभारणी ? – दादासाहेब शेळके (राष्ट्रीय...

पशु पक्ष्यांचे बळी देण्यासाठीच “संविधान मंदिराची” उभारणी ? – दादासाहेब शेळके (राष्ट्रीय अध्यक्ष,भीम टायगर सेना)

171

 

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

यवतमाळ (दिनांक 17 सप्टेंबर) 15 सप्टेंबर 2024 रोजी औध शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्थापन करण्यात आलेल्या संविधान मंदिराचे उद्घाटन देशाचे राष्ट्रपती जगदीप धनकड यांच्या हस्ते
दूरदृष्टी प्रणाली द्वारे करण्यात आलेले आहे.

राज्यातील 434 शासकीय औद्योगिक संस्थांमध्ये संविधान मंदिराची निर्मिती करण्यात आलेली आहे.

आपल्या देश व राज्यातील सरकार हे हिंदू मानसिक असुन सरकार व मनुवादी मानसिकतेचे लोक आजही न्यायालयाला न्यायमंदिर तर देशाला हिंदूस्थान म्हणतात.

संविधानाच्या आर्टिकल 1 नुसार देशाचे संविधानिक नाव भारत आहे. असे असतांना देशाला हिंदुस्तान म्हणणे ही मनुवादी मानसिकता असून याच मानसिकते मधुन संविधान मंदिर हे नाव आलेले आहे.
संविधानिलो जोडलेले मंदिर हे नाव धर्मवाचक आहे.

कारण 24 एप्रिल 1973 केशवानंद भारती प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सिक्री व 13 जज च्या खंडपीठाने सांगितले आहे धर्मनिरपेक्ष पण हा बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे. त्यामुळे मंदीर ह्या धर्मवाचक नावामुळे संविधानाच्या बेसिक स्ट्रक्चरला तडा गेला आहे.तसेच 1995 मध्ये एलआयसी ऑफ इंडिया या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने सांगितले की प्रास्ताविक हे संविधानाचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून त्याच प्रास्ताविक मध्ये आपल्या देशाला धर्मनिरपेक्ष बनविण्याचे वचन देण्यात आलेले
आहे.
त्यामुळे संविधानाला मंदिर हे नाव ठेवून धर्मनिरपेक्ष पणाला नख लावण्याचे काम सरकारने केलेले आहे.त्यामुळे शासनाने तात्काळ अशा धर्मवाचक नावात बदल करून संविधान भवन किंवा संविधानाला अनुसरून एखादे नाव ठेवावे अशी मी दादासाहेब शेळके भिम टायगर सेनेच्या वतीने मागणी करत आहे.

150 कोटी लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात 10 धर्म 7500 जाती 28 राज्ये 8 केंद्र शासित प्रदेश, अनेक प्रथा परंपरा असून या सर्वाला एका माळेत गुंफण्याचे काम आपले भारतीय संविधान करत आहे.त्यामुळे आपला देश एक संघ टिकून आहे.

याचे सर्व श्रेय भारतीय संविधानाला जात आहे.आपला देश धर्मनिरपेक्ष म्हणजेच आपला देश किंवा राज्य धार्मिक नाही, अधर्मी नाही तसेच धर्मविरोद्धी नाही किंवा धर्म समर्थक सुद्धा नाही.त्यामुळे शासनाने एखाद्या योजनेला धर्माला अनुसरून किंवा धर्म वाचक असे नाव देता येत नाही हे हिंदू मानसिकता असलेल्या सरकारला केव्हा कळणार आहे की नाही ? आणि मुळातच मंदिर हे नाव धर्मवाचक आहे एखाद्या धर्मा संबंधी आहे.

मुळात मंदिर अर्थात देऊळ त्यालाच म्हटले जाते जिथे देवाची स्थापना करून तेथे देवाची पूजा, अर्चना व प्रार्थना केल्या जाते.

जिथे देवाला काही तरी मागणी घातल्या जाते. जिथे पशु पक्ष्यांचे बळी दिल्या जातो असे ठिकाण आणि म्हणून संविधानाला मंदिर हे नाव जोडुन संविधान मंदिर तयार करून तिथे आपला देव बसवायचा आहे का ? आपल्याला संविधान मंदिरात पूजाअर्चा करायची आहे का? आपल्याला काही मागयचे आहे का ? आपल्याला काय पशु पक्ष्यांचे बळी द्यायचे का याचे उत्तर सरकारने दिले पाहिजेत धर्मनिरपेक्ष असलेल्या आपल्या देशात/राज्यात उद्या एखाद्या धर्माच्या लोकांनी म्हटले संविधान मंदिर नको संविधान विहार करा संविधान मस्जिद,संविधान गुरुद्वारा व संविधान चर्च असे नाव द्या हे सरकारला जमेल का ? म्हणून राज्य शासनाने तात्काळ संविधान मंदिर ऐवजी संविधान भवन किंवा संविधानाला अनुसरून नाव ठेवण्यात यावे.
धर्मवाचक नाव नको हो आणि दुसरा प्रश्न फक्त औद्योगिक संस्थेमध्ये संविधान भवन का ? केंद्र आणि राज्य शासनाचे जेवढे शासकीय कार्यालय आहेत त्याच्यात सुद्धा संविधान भवनाची निर्मिती करुन किमान संविधानातील प्रास्ताविकेचं वाचन बंधनकारक करावे व तसेच आपण एकमेकाला जसे नमस्कार, जय भीम, राम राम, आदाप,गुड मॉर्निंग इत्यादी जसे म्हणतो तसेच केंद्र व राज्य शासनाच्या प्रत्येक ऑफिसमध्ये संविधान भवनाची निर्मिती करून एकमेकास जय संविधान म्हणणे सक्तीचे करावे तरच देशात राष्ट्रीय एकता व एकात्मता मजबूत होईल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून बघितलेले स्वप्न पूर्ण होईल.जयभीम जय संविधान जय भारत अशी माहिती दादासाहेब शेळके (संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष भीम टायगर सेना मो.8766744644, 8380886935) यांनी आमचे जिल्हा प्रतिनिधी सिद्धार्थ दिवेकर यांच्याशी बोलताना दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here