Home महाराष्ट्र अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन.

अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन.

61

 

 

 

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515

गंगाखेड ;-उपविभागीय कार्यालय गंगाखेड येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त लढ्यातील अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.आयोजित कार्यक्रमास गंगाखेड विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉ.रत्नाकरजी गुट्टे यांनी उपस्थित राहून स्वतंत्र लढ्यातील अतुलनीय शौर्य दाखवणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केले केले.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. पण, त्यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानांमध्ये विखुरलेला होता. त्यावेळच्या ५६५ पैकी ५६२ संस्थांनांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शवली. त्यामुळे हि संस्थाने स्वतंत्र भारतात विलीन झाली. मात्र, हैदराबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. स्वातंत्र्यानंतर इंग्रजांची राजवट गेली. पण, या तीन संस्थानातील लोक मात्र अद्याप स्वतंत्र झाले नव्हते. त्या काळात मराठवाडा हा हैद्राबाद संस्थानाचा भाग होता आणि मराठवाड्याच्याा जनतेला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हैद्राबादच्या निजामाविरोधात दिर्घ लढा द्यावा लागला. तसेच अनेकांना या लढ्यात आपल्या प्राणांचे बलिदान द्यावे लागले, असे साहेबांनी उपस्थितांना सांगितले.

यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, , उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे, तहसीलदार उषाताई शृंगारे, पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे, यांच्यासह सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here