Home महाराष्ट्र समाजात वैचारिक घुसळण होण्यासाठी साहित्यिक उपक्रमाची आवश्यकता : प्राचार्य जी.पी.ढाकणे

समाजात वैचारिक घुसळण होण्यासाठी साहित्यिक उपक्रमाची आवश्यकता : प्राचार्य जी.पी.ढाकणे

78

 

पाथर्डी (प्रतिनिधी ) – समाजात वैचारिक घुसळण होण्यासाठी छोट्या मोठ्या सामाजिक आणि साहित्यिक उपक्रमाची आवश्यकता असून शब्दगंध च्या पाथर्डी शाखेने घेतलेला आजचा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी आहे. असे मत माजी प्राचार्य जी.पी. ढाकणे यांनी व्यक्त केले.
शब्दगंध साहित्यिक परिषद पाथर्डी शाखेच्या वतीने समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पाथर्डी तालुक्यातील व्यक्तींचा गुणगौरव सोहळा गाडेकर क्लास येथे संपन्न झाला. या कार्यक्रमा च्या अध्यक्षपदावरून प्राचार्य जी.पी. ढाकणे हे बोलत होते. यावेळी विचारपीठावर शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी,अध्यक्ष राजेंद्र उदागे, डॉ. रमेश वाघमारे, प्राचार्य अशोक दौंड, शाहीर भारत गाडेकर, मुख्याध्यापक एकनाथ ढोले, बंडूशेठ दानापुरे, शब्दगंधच्या पाथर्डी शाखेचे अध्यक्ष डॉ.अनिल पानखडे, उद्योजक अनंत ढोले आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ.ढाकणे म्हणाले की, आयुष्यामध्ये यश प्राप्त करायचे असेल तर ध्येय निश्चिती केले पाहिजे, प्रामाणिक पणे काम करण्याची सवय ठेवली पाहिजे. अविरतपणे कष्ट केले तर यशाच्या सर्वोच्च स्थानी विराजमान होता येतं.
शब्दगंध चे सचिव सुनील गोसावी यांनी गुणवंत विद्यार्थी व पुरस्कार प्राप्त साहित्यिकांच तोंड भरून कौतुक केले, पाथर्डी शाखे च्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी प्राचार्य अशोक दौंड म्हणाले की, विद्यार्थ्यांनी जुन्या पिढीतील नामवंतांचा आदर्श घेऊन आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अभ्यास केला पाहिजे. अभ्यासाला कोणताही शॉर्टकट नसून अभ्यासानंतरच योग्य ते पद प्रतिष्ठा आपल्याला मिळू शकते याचे भान ठेवायला हवे. यावेळी एकनाथ ढोले सर, राजेंद्र उदारे, सामाजिक कार्यकर्ते हुमायून आतार, बंडशेठ दानापुरे,कविवर्य बाळासाहेब कोठुळे यांनी मनोगत व्यक्त केले. राजेंद्र उदारे (काव्यभूषण ), बाळासाहेब कोठुळे (कुसुमाग्रज साहित्य भूषण ), नामदेव धायतडक (आदर्श शिक्षक ), अनंत ढोले (उद्योजक ) पुरस्कार मिळाल्याबद्दल शब्दगंध च्या वतीने पाथर्डी तालुक्याचे भूमिपुत्र म्हणून सन्मानित करण्यात आले. एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी निवड झालेले समर्थ जोशी,आदित्य अकोलकर, सिद्धेश पानखडे या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकासह सत्कार करण्यात आला. गणेश उत्सवानिमित्त रंगभरण स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचेही सत्कार करण्यात आले. पाथर्डी तालुका शाखेचे अध्यक्ष डॉ.अनिल पानखडे, प्रशांत रोडी, राजेंद्र जहागीरदार, बंडू आंधळे, भाऊसाहेब गोरे, डॉ.गिरीश जोशी, नितीन भालके इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चंद्रकांत उदागे यांनी केले तर बहारदार सूत्रसंचालन महादेव कौसे यांनी केले. गाडेकर क्लासचे संचालक बंडू गाडेकर यांनी सर्वांचे आभार मानले.
कार्यक्रमास पाथर्डी शहरातील साहित्यिक सांस्कृतिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here