Home महाराष्ट्र महात्मा फुले हायस्कूलची पावसाळी शैक्षणिक सहल ऐतिहासिक स्थळी !.. अजिंठा लेणी...

महात्मा फुले हायस्कूलची पावसाळी शैक्षणिक सहल ऐतिहासिक स्थळी !.. अजिंठा लेणी येथील शिल्पकला व चित्रकला अद्भुत- पी डी पाटील ( सहल प्रमुख ) काळ्याशार दगडात कोरलेले गौतम बुद्धांचे शिल्प आश्चर्यजनक – एच डी माळी.

130

 

धरणगांव प्रतिनिधी – पी डी पाटील सर

धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेतील विद्यार्थ्यांनी पावसाळी शैक्षणिक सहलीअंतर्गत ऐतिहासिक स्थळी अजिंठा लेणी येथे दि. १४ सप्टेंबर,२०२४ शनिवार रोजी भेट दिली. शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार सर यांच्या मार्गदर्शनाने सहल प्रमुख पी डी पाटील व एच डी माळी यांनी या ऐतिहासिक स्थळाला भेट दिली सर्वप्रथम बस वाहनचालक संदीप पाटील यांचे राष्ट्रपिता महात्मा जोतिराव फुले यांचा ग्रंथ देऊन सत्कार करून धरणगाव येथून बस निघाली.
मुलांना अजिंठा लेणी याबद्दल खूपच उत्सुकता होती. शैक्षणिक सहली सोबत मुलांचा हा अभ्यास दौरा होता. जे आपण इतिहासामध्ये शिकलो ते स्थळ आपण प्रत्यक्ष पाहत आहोत.निसर्गाच्या सानिध्यात असलेले अजिंठा लेणी या स्थळाने मुलांच्या विचारांना भुरळ घातली तेथील लेण्यांमधील कोरीव काम मूर्तीकला, चित्रकला पाहून मुलं स्तब्ध झाली तेथील गाईडच्या माध्यमातून लेणी क्र. १,२,१६ व १७ अजिंठा लेणीची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. यासोबतच अजिंठा येथील सर्वच लेण्या विद्यार्थ्यांनी विस्तृतपणे बारकाईने निरीक्षण केले व पाहण्याचा आनंद घेतला. यासोबतच विदेशी पर्यटकांसोबत संवाद देखील साधला व काही क्षणचित्रे टीपले.
सहली अंतर्गत विद्यार्थ्यांनी आपल्या नोटबुक मध्ये महत्त्वाचे मुद्दे नोंद केले. त्यांच्या चेहऱ्यावर खूपच आनंद दिसत होता. यानंतर सप्तकुंड धबधबा येथे देखील विद्यार्थ्यांनी भेट दिली. डोंगर रांगांमधील हे ठिकाण आणि लेणींमधील कोरीव काम मूर्तीकला, चित्रकला हे अद्भुत आहे असे प्रतिपादन पाटील यांनी केले. इतिहास विषय शिक्षक एच डी माळी यांनी विद्यार्थ्यांना लेणींविषयी विस्तृत अशी माहिती सांगितली.
निसर्गाचे हे आश्चर्यचकित रूप पाहून मुलं खूप आनंदी झाले सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी सामूहिक भोजनाचा आस्वाद घेतला. सहल प्रमुख पी डी पाटील, एच डी माळी, ग्रंथपाल गोपाल महाजन, जेष्ठ शिक्षीका एम के कापडणे, एम जे महाजन यांच्या अनमोल सहकार्याने ही पावसाळी शैक्षणिक सहल तसेच अभ्यास दौरा उत्साहात संपन्न झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here