चिमूर -आमदार बंटी भांगडिया यांच्या उपस्थितीत वाघेडा येथे ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना अंतर्गत निधी अंतर्गत ४० लक्ष रू. सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाले.
वाघेडा येथील जनतेनी भरपूर प्रेम दिलेले आहे. भागवत सप्ताह किंवा इतर कार्यक्रम सभागृहात होईल आणि लवकरच लोकार्पण होईल असे आश्वासन देत आमदार भांगडिया यांनी गणेश उत्सव, नवरात्री उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष राजु देवतळे, भाजप तालुका अध्यक्ष राजु झाडे, माजी सभापती प्रकाश वाकडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक घनश्यामजी डुकरे, चिमूर सहकारी तांदूळ गिरणी ओमप्रकाश गनोरकर, भाजप महिला आघाडी प्रदेश चिटणीस सौ. ममता डुकरे, तालुका अध्यक्ष सौ. मायाताई नन्नावरे, माजी प.स. सदस्य सौ वर्षा लोणाकर, सौं आशा मेश्राम, प्रवीण गनोरकर, सरपंच गजानन गुळधे, प्रशांत अंदनसरे, भूषण डाहूले, हेमराज दांडेकर, वामन बांगडे, प्रभारी सरपंच प्रविण श्रीरामे, प्रदीप कावळे सदस्य ग्रामपंचायत, सुरेश चौधरी, सूर्यभान चौधरी, तसेच समीर राचलवार, संजय नवघडे, एकनाथ थुटे, संजय खाटीक, अजहर शेख, सुधीर पोहनकर, बंटी वनकर, सचिन डाहूले, लला असावा, अमित जुमडे, गोलू मालोदे, मंगेश भुसारी, अभिषेक जाजू, हर्षल डुकरे आदी उपस्थित होते.