रुपेश वाळके दापोरी प्रतिनिधी :- हवामानातील होत असलेल्या बदलामुळे अवेळी पाऊस, अतिवृष्टी, मे महिन्यातील वाढीव तापमान, रोग व किडीचा प्रादुर्भाव अश्या विविध नैसर्गिक संकट व संत्राविक्रीची मोठी बाजारपेठ असलेल्या बांगलादेशातील अराजकता यामुळे व वाढीव आयात शुल्क या संकटामुळे संत्रा उत्पादन शेतकरी मेटाकुटीस आलेला असून नफ्यामुळे असणारी संत्रा शेती, आता तोट्याकडे जात आहे, त्याकरिता शेतकर्यांनी संघटीत होऊन समूहाने उत्पादन तंत्रज्ञांनाचा अवलंब करणे गरजेचे असून मा. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी अपेक्षित केल्याप्रमाणे शेतकरी उत्पादक कंपन्याची शिखर कंपनी असलेल्या विदर्भ अग्रोविजन प्रोड्युसर कंपनी मार्फत कार्यन्वित होणारा सुमारे १०० कोटी गुंतवणूक असलेला व २०० मे. टन प्रति दिवस गाळप क्षमता असलेला संत्रा प्रक्रिया प्रकल्प संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी “गेम चेंजर ठरेल असे प्रतिपादन केले.
मॅग्नेट प्रकल्प व श्रमजीवी नागपुरी संत्रा प्रोड्युसर कंपनी ली. वरुड मार्फत पंजाबबाबा सभागृह, मोर्शी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोर्शी तालुका कृषी निविष्टा विक्रेता संघाचे अध्यक्ष सुहास ठाकरे होते,
तर प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र कृषी पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक व मॅग्नेट प्रकल्पाचे प्रकल्प उपसंचालक दिनेश डागा, डॉ. पं.दे.कृ.वि.चे शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र वानखडे, डॉ. राजीव घावडे, डॉ. एस. आर. पाटील, श्रीमती मयुरी मिसळ तसेच कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी मोर्शी प्रफुल सातव, स्मार्ट प्रकल्पाचे जिल्हा मूल्य साखळी तज्ञ निलेश राठोड उपस्थित होते. तर विशेष उपस्थिती म्हणून उद्योजक नवीन पेठे, निलेश रोडे, प्रा, संजय पांडव, उपस्थित होते याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक निलेश मगर्दे, अध्यक्ष श्रमजीवी ना. सं. प्रो कंपनी व सूत्र संचालन व आभार प्रदर्शन रमेश जिचकार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुधीर बेहरे, प्रवीण प्रफुल्ल लाडोळे, ‘सांबारतोडे, टाटा सी. सेफ चे अजिंक्य जिचकार, अनुराग देशमुख यांनी प्रयत्न केले.
सदरील कार्यक्रमास श्रमजीवी नागपुरी संत्रा कंपनीचे संचालक बाळू पाटील कोहळे, मनोहर पावडे, सुभाष शेळके, विष्णुपंत निकम, तसेच संत्रा उप्तादक शेतकरी रुपेश वाळके, सुरेश आढवू, विलास राऊत, नितीन गेडाम, रूपरावजी गेडाम, यादवराव ठाकरे, प्रकाश विघे, केशव पांडे, अंकुश यादव, रमेश ढोमणे, रमेश दिवे यांच्यासह पंचकोशीतील शेकडो शेतकरी उपस्थित होते.