बाळासाहेब ढोले, विशेष प्रतिनिधी मो. 78751 57855
पुसद – येथील शासकीय विश्रामगृह येथे युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेशजी कचकलवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली नवीन पदाधिकाऱ्यांना युवा ग्रामीण पत्रकार संघटनेत नियुक्ती देण्यात आली,
त्यानुसार अनुक्रमे प्रशांत राठोड यांना तालुका संघटक पदी, तर कैलास वाकोडे यांना कार्याध्यक्षपदी व सिद्धार्थ कदम यांना युवा ग्रामीण पत्रकार संघाचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून तर विनोद कांबळे यांना तालुका सहसंघटक पदी नियुक्ती देण्यात आली,
युवा ग्रामीण पत्रकार संघाचे सदस्य म्हणून अनिल पवार यांना नियुक्ती देण्यात आली तर विशेष बाब म्हणून ऍड. दिनेश राठोड आणि ऍड. गजानन कनोजे यांना युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या विशेष सल्लागार पदी नियुक्ती देण्यात आली,
याप्रसंगी युवा ग्रामीण पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष राजू राठोड तसेच शहर अध्यक्ष कुलदीप सुरोशे, युवा ग्रामीण पत्रकार संघाचे पुसद तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मेटकर व उपशहर प्रमुख मारोतराव कांबळे यासह विभागीय अध्यक्ष म्हणून युवा ग्रामीण पत्रकार संघाचे विजय सूर्यवंशी हे प्रामुख्याने उपस्थित होते,