✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड (दिनांक ११ सप्टेंबर) “उमरखेड तालुक्यातील टाकळी येथे सुरू असलेली अवैध्य दारू विक्री तात्काळ बंद करा..!
(अन्यथा आम्ही पोलीस स्टेशन च्या समोर संविधानिक मार्गाने उपोषण करू..! – टाकळी वासियांची मागणी) केली आहे.
सध्या युवा पिढी ही प्रचंड व्यसनाधीन झालेली बघायला मिळते अशातच गावात शहरात तालुक्यात शांतता नांदायची असेल तर अवैध्य दारू वगैरे नशिल्या पदार्थांवर त्याची अवैध्य विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी उमरखेड तालुक्यातील टाकळी येथील रहिवाशी नागरिकांनी केली.
“पोलिस प्रशासनाने अवैध्य दारू विक्री वर कठोर कारवाई करून ती तात्काळ बंद न केल्यास संविधानिक पद्धतीने उपोषण करण्याच्या गावकऱ्यांच्या मागणीच्या समर्थनात उतरू” असा इशारा यावेळी बहुजन मुक्ती पार्टी चे विद्वान केवटे यांनी दिला.
टाकळी येथील महिला,पुरुष,युवा मोठ्या संख्येने गावातील अवैध्य दारू विक्री बंद व्हावी.
यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे मागणी करत आहेत.या अगोदरही अनेक निवेदने,इशारे देऊन सुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून केवळ आश्वासन दिल्या जाते.
परंतु कठोर कारवाई होत नाही.म्हणून टाकळी येथील नागरिकांनी आज ग्रामसभेत ठराव घेऊन मोठ्या संख्येने पोलिस प्रशासन,तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी,जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले.
सन उत्सवांच्या तोंडावर गावातील अवैध्य दारू विक्री मुळे गावात भांडणे,वाद विवाद,असे प्रकार सुरू असून,महिला सुरक्षा, हे प्रश्न निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होऊन गावातील शांतता टिकावी या उद्देशाने येथील नागरिकांनी आज विविध शासकीय अधिकारी कार्यालयांना आपल्या मागणीचे निवेदन दिले.
यावेळी बाजीराव गायकवाड,उपसरपंच जाधव,गजानन कदम, संदीप घाडगे,बालाजी कदम,अनिल जाधव,किसन जाधव,सचिन कदम, बाळू सुरोशे, उदय जाधव,हरिदास भालेराव, गजानन गंगात्रे,सुनील चव्हाण, धनंजय भालेराव,ऋषिकेश भालेराव, योगेश भालेराव,विश्वास कदम, नारायण कदम,नागेश जाधव, यांसह युवा, विद्यार्थी, नागरिक गावकरी,मोठ्या संख्येने उपस्थित होते.