Home महाराष्ट्र पैनगंगा नदीपात्रात अखेर देवसरी येथील संदिप चा मृतदेह आढळला

पैनगंगा नदीपात्रात अखेर देवसरी येथील संदिप चा मृतदेह आढळला

1774

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ) मो.9823995466

उमरखेड (दिनांक ११)
तालुक्यातील देवसरी येथील इसम संदिप देवसरकर (३७) हे देवसरी गावाजवळच असलेल्या पैनगंगा नदीवरील बंधाऱ्याजवळ पाण्यात पडल्याची घटना ९ सप्टेबर रोजी सायंकाळी ५ वाजता च्या दरम्याण घडली होती.

परंतु घटने नंतर पैनगंगा नदिपात्रात सर्वत्र गांव नागरिक, नातेवाईक यांनी शोधाशोध घेतल्या जात असताना देखील नदिपात्रात कुठे हि मृतक संदिप चा शोध लागत नव्हता अखेर हि बाब एन. डि. आर. एफ पथकांच्या च्या मदतीने चातारी परीसरातील नदिपात्रात शोध घेताच ११ सप्टेंबर ला तब्बल ३७ तासानंतर मृतदेह सापडला मृत संदिपच्या पाठीमागे आई, पत्नी मुले असा परिवार असुन मृत संदिपच्या अपघाती मृत्यूमुळे संपूर्ण देवसरी गावावर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here