✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466
उमरखेड (दि. ९ सप्टेंबर)
येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयाचे संजीवक कै. डॉ. आत्मारामजी गावंडे यांचा जन्म दिवस ‘कृतज्ञता दिन’ (थॅंक्स गिव्हिंग डे) म्हणून विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
सोमवार (दि. ९) रोजी गावंडे महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथक, इनरव्हील क्लब व रोटरी क्लब व आर.आर.सी. क्लब, उमरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी नेत्र चिकित्सा, दंत चिकित्सा आणि विद्यार्थी व नागरिकांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरात ४५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्त संकलन करण्यासाठी नांदेडच्या जिजाई रक्तपेढीचे सहकार्य लाभले.
यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर, संस्थेचे सचिव डॉ. यादवराव राऊत, साहेबराव कांबळे, रोटरी क्लबचे डॉ. व्यवहारे, प्रा. प्रकाश देशमुख, केतन महेश्वरी, डॉ. कृष्णा नाईक व राम सारडा,सुरेंद्र कोडगीरवार उपस्थित होते.
इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष, सौ.आशाताई देवसरकर, कुसूम गिरी, रोहिणी चक्करवार व इतर पदाधिकारी,गावंडे महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमांतर्गत १०० विद्यार्थ्यांची दंत तपासणी करण्यात आली. उमरखेड येथील दंतरोग तज्ज्ञ डॉ. विक्रांत भोसकर यांचे सहकार्य लाभले.
यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य राम देवसरकर, सचिव डॉ. यादवराव राऊत आणि संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव बा. कदम, उपप्राचार्य डॉ. व्ही. पी. कदम, डॉ. डी. व्ही. तायडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. पी. एम. गुजर, पर्यवेक्षक प्रा. बी. यु. लाभसेटवार, प्रा. एस. बी. वाघमारे,अधीक्षक साहेबराव कांबळे, गजानन देवसरकर, सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रो. डॉ. प्रशांत अनासाने, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. एस. एस. इंगळे तसेच एन.सी.सी चे कॅप्टन प्रा. एस. एस. पाचकुडके, प्रा. अभय जोशी, प्रा. एस. व्ही. सुर्वे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. डॉ. माधव कल्याणकर , डॉ. आर. जे. डहाके, श्री. जी. एन. सादूडे , श्री. रामेश्वर बावस्कर, श्री. व्ही. आर. पोटे यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग होता. राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेच्या सर्व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम व शिबिरांच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.