Home महाराष्ट्र युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या चौसाळा शहरअध्यक्षपदी खाजामिया जहागिरदार

युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या चौसाळा शहरअध्यक्षपदी खाजामिया जहागिरदार

91

 

चौसाळा (प्रतिनिधी)- बीड तालुक्यातील चौसाळा येथिल स्वाभिमानी पत्रकार खाँजामिया जहागिरदार यांची युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या चौसाळा शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार व बीड जिल्हाउपाध्यक्ष विवेक कुचेकर युवक आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष हरीओम क्षीरसागर यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे खाँजामिया जहागिरदार यांची चौसाळा शहर अध्यक्षपदी निवड केली आहे. पत्रकार म्हणुन त्यांना प्रदीर्घ अनुभव असुन बालाघाटावर पत्रकारांशी त्यांचा चागंला परिचय असुन लोकप्रिय सांय.दैनिक रिपोर्टरचे चौसाळा सर्कल प्रतिनिधी म्हणुन त्यांनी सामाजिक,सांस्कृतीक,धार्मीक,क्रीडा,कृषी तसेच राजकारण आदी विषयावर नेहमी समाजपयोगी बातम्या प्रकाशित केल्या आहेत.चौसाळा शहर अध्यक्ष पदावर नियुक्ती झाल्याबद्दल बालाघाटासह चौसाळा सर्कलमध्ये युवा ग्रामीण पत्रकार संघटना अधीक मजबुत करेन व ग्रामीण भागातील पत्रकारांना युवा ग्रामीण पत्रकार संघटनेशी जोडेल अशी प्रतिक्रिया खाँजामिया जहागिरदार यांनी दिली. खाँजामिया जहागिरदार आपल्या नियक्तीचे श्रेय युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार व बीड जिल्हाउपाध्यक्ष विवेक कुचेकर युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष हरिओम क्षीरसागर यांना देतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here