Home चंद्रपूर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलां पर्यत पोहचवून भाजप महिला आघाडी मजबूत...

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलां पर्यत पोहचवून भाजप महिला आघाडी मजबूत करा-महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष वंदना शेंडे

101

 

चंद्रपूर – भाजप महिला आघाडी चंद्रपूर जिल्हा संघटनात्मक बैठका सुरू असून असताना चिमूर तालुक्यात आमदार बंटीभाऊ भांगडिया लाभले असून महिला आघाडी च्या विविध ब्रँच मधून अनेक महिलांना स्थान देण्यात यावे. जेणेकरून महिलांना संधी मिळेल. महिलांनी पक्ष म्हणून काम करीत रहावे.येत्या ५० दिवसात केंद्र, राज्य सरकारच्या योजना सह मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलां पर्यत पोहचवून महिला आघाडी मजबूत करण्याचे आवाहन भाजप महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष वंदना शेंडे यांनी केले.

आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या नवीन वाडा, चिमूर येथे झालेल्या भाजप महिला आघाडी चिमूर तालुका ची बैठक प्रसंगी मंचावर भाजप महिला आघाडी प्रदेश चिटणीस सौ. ममता डुकरे, जिल्हा महामंत्री प्रियाताई लांबट, सौ. गीता लिंगायत, सौ. वर्षा शेंडे, सौ दुर्गा सातपुते, सौ. भारती गोडे, सौ दीपाली बानकर आदी उपस्थित होत्या.

दरम्यान सौ गीता लिंगायत, सौ ममता डुकरे यांचे संघटनात्मक मार्गदर्शन झाले. प्रास्ताविक भाजप महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौ मायाताई नन्नावरे यांनी केले. संचालन सौ वैशाली भसारकर यांनी केले. तालुक्यातील महिला पदाधिकारी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here