गडचिरोली : कोरोना महामारी मुळे बल्लारशहा – गोंदिया रेल्वे मार्गांवरील अनेक गाड्या बंद करण्यात आल्या. कोरोना जाऊन काळ लोटला असला तरी बऱ्याच रेल्वे गाड्या सुरु करण्यात आलेल्या नसल्याने अनेक प्रवाशांना त्याचा त्रास होत होता. त्यामध्ये वडसा – चांदाफोर्ड, चांदाफोर्ड – गोंदिया रेल्वेगाडीचा समावेश होता वारंवार मागणी करून देखील बंद रेल्वे पूर्ववत सुरु करण्यात आली नसल्याने. या संदर्भात गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे नवनियुक्त खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी संसदेच्या पहिल्याच अधिवेशनात वडसा – चांदाफोर्ड, चांदाफोर्ड – गोंदिया रेल्वे पूर्ववत सुरु करण्याची मागणी केली. अखेर खासदार डॉ. किरसान यांच्या प्रयत्नाना यश आले असून कोरोना काळात बंद झालेली वडसा-चांदाफोर्ड, चांदाफोर्ड – गोंदिया ही रेल्वे पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. 8 सप्टेंबर 2024 रोजी, वडसा रेल्वे स्थानकावर सकाळी 7.15 मिनिटांनी खासदार डॉ. नामदेव नामदेव किरसान यांनी वडसा – चांदाफोर्ड रेल्वे ला हिरवी झेंडी दाखविल्यानंतर सदर रेल्वे गाड्या पूर्ववत जनतेच्या सेवेत रुजू झाल्या आहेत.
खासदार डॉ. किरसान यांनी सदर रेल्वेने वडसा ते नागभीड असा प्रवास करून ट्रेन मधील नागरिकांशी चर्चा सुद्धा केली. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, आमदार कृष्णा गजबे, वडसा तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, माजी प. स. सभापती परसरामजी टिकले, काँग्रेस नेते रामदास मसराम, आरमोरी तालुकाध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, किसान सेल अध्यक्ष वामनराव सावसाकडे, नितीन राऊत, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, नरेंद्र गजपुरे, संजय कराणकर, सरपंच कोंढाळा अपर्णा राऊत, मनोज ढोरे, जावेद शेख, विजय सुपारे, भास्कर डांगे, श्याम धाईत, अविनाश गेडाम, नंदू चावला, गणेश फाफट, राजु रासेकर, लक्ष्मण रामानी, ओम शर्मा, देवदास ठाकरे, शालीक पत्रे, कपिल पिल्लारे, विपिन राऊत, जेसा मोटवानी, विकी रामानी, महेंद्र खरकाटे, धीरज बुल्ले, संतोष श्यामदासानी, आर पी एफ ऑफिसर जयसिंग, लोको पायलट आर. के. गुप्ता, असिस्टंट लोको पायलट रजत खडेंनाथ, गार्ड वेंकटराव, माधुरी मडावी, निलोफर शेख, जयमाला पेंदाम, रजनी आत्राम सह पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने प्रवासी यावेळी उपस्थित होते.