Home चंद्रपूर श्री बाबा रामदेव जन्मोत्सवाचा जम्मा जागरण कार्यक्रमाला भाविकांचा उत्तम प्रतिसाद- “छोटे मोटे...

श्री बाबा रामदेव जन्मोत्सवाचा जम्मा जागरण कार्यक्रमाला भाविकांचा उत्तम प्रतिसाद- “छोटे मोटे सब बोलेंगे बाबा तेरी जय बोलेंगे” या जयघोषाने दुमदुमली चिमूर क्रांतीनगरी!

138

 

 

सुयोग सुरेश डांगे, विशेष प्रतिनिधी, मो. नं. ८६०५५९२८३०

 

चिमूर- श्री रामदेव बाबा भक्त मंडळ चिमूरच्या वतीने २९ वी श्री बाबा रामदेव जन्मोस्तव विविध कार्यक्रमने संपन्न झाला असून दिनांक ५ सप्टेंबरला भव्यदिव्य कलस यात्रा काढण्यात आलेली होती. या कलस यात्रेत “छोटे मोटे सब बोलेंगे बाबा तेरी जय बोलेंगे” या जयघोषनेने चिमूर क्रांतीनगरी दुमदुमली.

श्री रामदेवबाबा भक्त मंडळच्या वतीने दिनांक ४ सप्टेंबर ला रात्री जम्मा जागरण निमित्त हैद्राबाद येथील श्री. रामदेव बाबा यांचे परम भक्त सुशील गोपालजी बजाज व त्यांच्या चमुंचा भजन संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

दिनांक ५ सप्टेंबर ला सकाळी पाच वाजता भजन सध्याची आरती तसेच दुपारी ४ वाजता श्री रामदेव बाबा मंदिर येथून भव्य कलस शोभा यात्रा निघत मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत नेहरू चौक ते दुकान लाईन मार्गे श्री रामदेव बाबा मंदिरात पोहचली. या शोभा यात्रेत भजन, दिंडी, ढोल तासा पथक सह अनेक देवीदेवतेचे देखावे होते.
छोटे मोटे सब बोलेंगे बाबा तेरी जय बोलेंगे च्या जयघोषणेने भक्त गण तल्लीन झाले होते. या शोभा यात्रेत माजी आमदार मितेशजी भांगडिया, आमदार बंटी भांगडिया, भांगडिया फाउंडेशनचे चेअरमन श्रीकांत भांगडिया, पार्थ भांगडिया, मेघा भांगडिया, अपर्णा भांगडिया, निलमभाऊ राचलवार, राजु देवतळे, मनीष तुंम्पलीवार, समीर राचलवार, ओमप्रकाश गनोरकर, एकनाथ थुटे, अजहर शेख, संजय खाटीक, भिमराव ठावरी, गोपाल बलदुआ, कमल असावा, टिमू बलदुआ, राजु बलदुआ, श्याम बंग, मंगेश धाडसे, कुणाल कावरे, बंटी वनकर, श्रेयस लाखे, संजय नवघडे आदी भक्त गण मोठया प्रमाणात सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here