विश्वकर्मीय राज्यस्तरीय ओबीसी सुतार समाजात राज्यस्तरीय नामकरणाचा गवगवा करणाऱ्या असंख्य सामाजिक संघटना, संस्था, प्रतिष्ठान कार्यरत असतील आणि यांच्या कार्यकारिणीवर शेकडोंच्या संख्येने धडाडीच्या पदाधिकाऱ्यांची निवड केलेली असते, याच माध्यमातून समाजात कर्तबगार कर्तृत्ववान कार्यसम्राट समाज नेतृत्व तर धडाकेबाज युवक नेतृत्व उदयास येतात आणि मोठ्या दिमाखात मोठ्या आवेशात समाजात नेतेगिरी करतात आणि समाजाचे कर्तृत्ववान समाज नेतृत्व म्हणूनच ओबीसी सुतार समाजात विविध सामाजिक मंचावर मानसन्मान पदरात पाडून घेतात. परंतु, ओबीसी संदर्भात समाज जागृती निर्माण करण्याच्या बाबतीत मात्र चक्कार शब्द सुद्धा काढत नाहीत.
संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसींसाठी संविधानात विशिष्ट कलमे तयार करून ओबीसींना त्यांचे सामाजिक राजकीय शैक्षणिक अधिकार बहाल केलेले आहेत. त्याच संविधानाचा आधार घेऊनच समाजातील नेत्यांना समाजात समाज प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करायचे असतात, विश्वकर्मीय सुतार समाज ओबीसी प्रवर्गातील मोठा ओबीसी घटक असूनही स्वयंघोषित नेते ओबीसी संदर्भात समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करीत नाहीत, त्यामुळे समाजात ओबीसी संदर्भात समाज जागृती निर्माण होत नाही. याला प्रामुख्याने समाजातील सर्वच स्वयंघोषित नेतेच नैतिक दृष्टीने जबाबदार आहेत हे मी जबाबदारी पुर्वकच लिहीतो, म्हणूनच म्हणावेसे वाटते कि,ओबीसी सुतार समाज नेत्यांनी समाजहितासाठी अज्ञातवासात न जाता जमिनीवर उतरणे गरजेचे आहे.
50 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या विश्वकर्मीय सुतार समाजाची असल्याचे सोशल मीडियावर वाचण्यात आलेले आहे, वास्तविक ओबीसींची जातीनिहाय जनगणना झालेली नसल्याने समाजातील स्वयंघोषित नेते मनाला येईल ती लोकसंख्या जाहीर करून स्वतःचा मोठेपणा मिरवतात. यावर समाजाने विश्वास ठेऊ नये. ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्रात कोणत्याच गोष्टींची कमतरता अजिबात जाणवत नाही असं छातीठोकपणे कोणताही स्वयंघोषित नेता जबाबदारी पूर्वकच सांगणार नाहीत. सुतार समाजात राज्यभरात सर्वगुण संपन्नता गुणवत्ता कोणती हे कोणालाच मोजता येत नाही. स्वयंघोषित नेते समाजात फक्त नेतेगिरी करण्यासाठी उतावीळ आणि नावासाठीच हापापलेले असतात.
सुतार समाजात सामाजिक क्षेत्रात वैयक्तिक पातळीवर प्रगतीला अजिबात महत्व दिले जात नाही. हे अगोदर सर्वप्रथम मी सामाजिक दृष्टीने मुद्दामच समाजाला जाहिर पणे सांगतो. समाजात विविध विषयांवर समाज प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केल्याने समाजात वैचारिकतेचे आणि चैतन्याचे वातावरण निर्मिती होईल यासाठीच ओबीसी सुतार समाज नेत्यांनी समाजहितासाठी अज्ञातवासात न जाता जमिनीवर उतरणे गरजेचे आहे. जनजागृती, समाज जागृती प्रबोधन करण्यासाठी समाजहिताचे महत्व लक्षात घेऊन सजग राहीले पाहिजे. हे दिसत नसल्यामुळे माझ्या सारख्या खेड्यातील अडाणी आणि सामाजिक क्षेत्रातील कोणत्याही पदावर नसलेल्या सर्वसामान्य समाज बांधवाला जाहीर मांडावे लागते. ओबीसी सुतार समाजात स्वतःला समाज नेतृत्व समजणाऱ्या स्वयंघोषित नेत्यांनी आपापली ओबीसी सुतार समाजात जेवढी समाजशक्ती असेल, जेवढी समाज ताकद असेल, जेवढे समाज प्रभुत्व असेल, जेवढे स्टार प्रचारक असतील जेवढे निष्ठावंत तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते असतील या सर्वांच्या ज्ञानाचा फायदा समाजाला झाला पाहिजे यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत.
विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजातील सामाजिक क्षेत्रातील अनुभवी, मुरब्बी, प्रख्यात परखडपणे पत्रकारिता करणारे मान्यता प्राप्त मुद्दे समजणारे मुद्दा सोडुन सोयीनुसार पळवाट न शोधणारे, सुशिक्षित उच्चशिक्षित, चाणाक्ष, चतुर, चिकित्सक, बुद्धिप्रामाण्यवादी इथं शब्दफेक करणारे शब्दप्रयोग करून शब्दप्रामाण्यवादी नको असे दिग्गज धुरंधर, मातब्बर भाषेवर प्रभुत्व असलेले नेते कार्यकर्ते आज समाजात दिसत नाहीत आणि असतील तर त्यांनी ओबीसी सुतार समाज नेत्यांनी समाजहितासाठी अज्ञातवासात न जाता जमिनीवर उतरणे गरजेचे आहे.
ओबीसी सुतार समाजातील सन्माननीय पत्रकार बांधवांना बोलवा पत्रकार परिषद घ्या, पत्रकार, संपादक, समाजसेवक, विचारवंत बुद्धीजीवी बोलवा, या व्यतिरिक्त अजुनही काही अजब कला अस्तित्वात असतील तर त्या अजब गजब कलेचा इत्यादी सर्वांचा पुरेपुर, भरपूर योग्य वापर करा आणि ताबडतोब, झटपट, फटाफट, लगेचच नकारात्मकता देणारे विचार झटकून टाका आणि सकारात्मक विचाराने आपापली सर्वच समाज यंत्रणा जलदगतीने,वायुच्या वेगाने,तुफान सुसाट वेगाने राज्यभरातील जिल्हा,तालुका गावागावात जाऊ द्या.सर्वच सोशल मीडियाचा पुरेपूर वारेमाप वापर करा आणि त्यासाठी ओबीसी सुतार समाज नेत्यांनी समाजहितासाठी अज्ञातवासात न जाता जमिनीवर उतरणे गरजेचे आहे.
ओबीसी,आरक्षण,संविधान जनगणना, संवैधानिक अधिकार, सत्ता संपत्ती ज्ञान इत्यादी बद्दल आपापल्या ज्ञानाचा ज्ञान भांडार खुला करा, ज्ञानाचा ज्ञान महासागर खुला करा. ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्रात राज्यस्तरीय ओबीसी सुतार समाज जागृती मेळावा,समाज आंदोलन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करून ओबीसी सुतार समाज नेत्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी समाज जागरूकता अभियान राबवावे. ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्रात सत्ता संपत्ती ज्ञान आणि संविधान,जनगणना बद्दल समाज जागृती निर्माण करणे, संवैधानिक अधिकार,राजकीय हिस्सेदारी, ओबीसी बद्दल तसेच अन्य विषयावर समाजात समाज प्रबोधनात्मक सामाजिक वैचारिक आणि नैतिक दृष्टीने जबाबदारी कोणाची हा गुंता सोडविण्यासाठी यासाठी ओबीसी सुतार समाज नेत्यांनी समाजहितासाठी अज्ञातवासात न जाता जमिनीवर उतरणे गरजेचे आहे.
विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजातील कर्तबगार प्रेरणास्थान जिगरबाज धडाडीचे युवक नेते आणि मुरब्बी अनुभवी समाज नेत्यांच्या अज्ञातवासामुळे ओबीसी सुतार समाजाचे सामाजिक क्षेत्रातील भलेमोठे वैचारिक नुकसान होईल ते भरून काढण्यासाठी ओबीसी सुतार समाज नेत्यांनी जमिनीवरील मैदानात ताकदीने उतराला पाहिजे. ओबीसी समाजात समाज प्रबोधनात्मक, जागृती करण्यासाठी ओबीसी सुतार समाज नेत्यांनी समाजहितासाठी अज्ञातवासात न जाता जमिनीवर उतरणे गरजेचे आहे आणी ओबीसी सुतार समाजात तसेच खऱ्या अर्थाने ओबीसी बहुजन चळवळीत कर्तबगार मान्यताप्राप्त समाज नेते म्हणूनच मान्यता मिळवा.
ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्रातील ओबीसी सुतार नेतृत्व आणी ओबीसी सुतार युवा नेतृत्व मान्यवरांच्या ओबीसी सुतार पथकाने सामाजिक दृष्टीने अज्ञानवासात जाऊ नये कारण आपले सामाजिक दृष्टीने अज्ञावासात जाणे समाजहिताचे अजिबात ठरणार नाही कारण ओबीसी सुतार समाजाला आपली आणि आपल्या ज्ञान भांडार खुला करण्याची गरज आहे कारण आपणच तर ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्रातील खऱ्या अर्थाने विकासात्मक योजना घेऊन ओबीसी सुतार समाजाचे प्रबोधनात्मक महामेरू झाले पाहिजे. ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्रातील सन्माननीय समाज नेतेगण आणि सन्माननीय धडाकेबाज युवक नेत्यांनी सुतार सामाजिक क्षेत्रात खऱ्या अर्थाने जमिनीवर सामाजिक वैचारिक व विकासात्मक चळवळ नेली पाहिजे. ओबीसी सुतार समाज जागृती अभियान जोरात राबविण्यासाठी तन, मन, धनाने जमिनीवर उतरणे गरजेचे आहे. त्यासाठी तोंडात साखर,पायाला भिंगरी आणि डोक्यावर बर्फ ठेवावे लागेल तरच ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्रातील नेते कार्यकर्ते साधारणतः दोन वर्षात ओबीसी सुतार समाजाचे सामाजिक क्षेत्रातील राज्यातील मान्यताप्राप्त नेते होतील.
अज्ञातवासात या शब्दाला अनुसरून सुतार मनोगत व्यक्त केले आहे. अज्ञातवासामुळे ओबीसी सुतार सामाजिक क्षेत्रातील भलेमोठे नुकसान होईल. धडाकेबाज पध्दतीने ओबीसी बद्दल सुतार समाजात समाज जागृती कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. धडाकेबाज म्हणजे राज्यस्तरीय विचार करता किती हजार किती लाख ओबीसी सुतार समाज बांधवांची उपस्थिती असणे अपेक्षित आहे आपण सर्वंच जण समजदार आहोत अर्थात ओबीसी सुतार समाजाच्या एकुण लोकसंख्या नुसार एकुण सरासरी उपस्थिती ताकद टक्केवारी असणे गरजेचे नाही का?या करिता ओबीसी सुतार समाज नेत्यांनी समाजहितासाठी अज्ञातवासात न जाता जमिनीवर उतरणे गरजेचे आहे.
ओबीसी सुतार समाजाने”डोळे बंद करून द्या टाळी आणि घ्या टाळी तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू फुलांच्या माळा” हेच समाजकार्य नसते. सामाजिक क्षेत्रातील सत्यावर आधारित तर्कशुद्ध समाज तत्वाच्या आधारावर तसेच सामाजिक वैचारिक आणि नैतिक मूल्यांच्या आधारावर समाज संघटना उभी राहिली तर इतिहासात तिची नोंद होईल अन्यथा ५२ टक्के ओबीसी जातीतील किती टक्के जागृत होते हा इतिहास लिहला जाईल. यासाठी मला कोणी “मुर्ख” म्हटले तरी मी माझे मत मांडत राहतो, कदाचित ते चुकीचे असू शकते. पण ते कसे चुकीचे आहे हे मला कोणी छातीठोक पणे समजावून सांगितले पाहिजे हिच माझी इच्छाशक्ती आहे.म्हणूनच आवर्जून सांगावेसे वाटते कि, ओबीसी सुतार समाज नेत्यांनी समाजहितासाठी अज्ञातवासात न जाता जमिनीवर उतरणे गरजेचे आहे.
प्रमोद सूर्यवंशी, चिखली मातृतीर्थ,
बुलडाणा मो. 8605569521