Home महाराष्ट्र बैल हा अमरत्व असलेला शेतकऱ्यांचा खरा सखा :- ओमप्रकाश गनोरकर आमदार...

बैल हा अमरत्व असलेला शेतकऱ्यांचा खरा सखा :- ओमप्रकाश गनोरकर आमदार बंटी भांगडिया यांचे कडून दोन सायकल व किट वाटप

32

 

चिमूर प्रतिनिधी

तळोधी नाईक येथील एकता नाट्य कला मंडळ च्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही तान्हा पोळा उत्सव साजरा करण्यात आला. बक्षीस वितरण प्रसंगी चिमूर सहकारी तांदूळ गिरणी समिती संचालक तथा भाजप नेते ओमप्रकाश गनोरकर यांनी प्रमुख पाहुणे असताना मार्गदर्शन करीत ते म्हणाले की बैलांचा पोळा उत्सव हा अजरामर राहणार असून शेतकऱ्यांच्या शेतीत राबणारा बैल असून त्याच्या मृत्यू नंतर ही चमडा पासून चप्पल जोडा तयार होत असून शेतकरी सुरक्षित राहील असे सांगत बैल वृद्ध झाला तरी तो न विकता गो शाळेत पाठवा असे सांगून बैल हा शेतकऱ्यांचा खरा सखा असल्याचे मार्गदर्शन केले. यावेळी चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांचे कडून दोन सायकल तथा तान्हा पोळ्यात नंदी बैल घेऊन येणाऱ्या सर्व बालकांना किट वाटप करण्यात आली.
याप्रसंगी रमेश भोयर उपाध्यक्ष टेकेपार आदिवासी विविध सोसायटी,रामप्रभू नागदेवते पोलीस पाटील, तंटामुक्ती समिती अध्यक्ष बंडू कुकडे, भाजपा नेते नामदेव नन्नावरे, राजेंद्र दहिकर, बलकी वनरक्षक, कोटेवार वनरक्षक, टेकेपार तमूस अध्यक्ष सोहम गोरवे,किशोर येसांबरे वनसमिती अध्यक्ष, बूथ अध्यक्ष अंकुश मेश्राम, सलीम शेख, अनिल येसांबरे, मारोती सहारे आदी उपस्थित होते.

या स्पर्धेचे बक्षीस युवा उद्योजक सुनील समर्थ, तळोधी चे शेतकरी तथा भाजपा युवा नेता समीर राचलवार, कोटेवार वनरक्षक, बलकी वनरक्षक, आशिष कावरे, अविनाश सोनवाणे, अमोल कुकडे, डॉ. बावनकुळे, अमोल नागुलकर, मनोहर गुळधे, शीतल सोनवणे, साबेरा शेख, विकास खाटे यांचे कडून प्रायोजित करण्यात आले होते
कार्यक्रमांचे संचालन माजी सरपंच कलीम शेख यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रमोद राऊत यांनी केले. यावेळी शेकडो नंदी बैल धारक बाल गोपाल व पालक वर्ग उपस्थित होते. नंदी बैल पोळ्यात यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here