चिमूर -विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांच्या प्रयत्नाने चिमूर येथे सहा कोटी रुपये किमतीचे श्री संत संताजी जगनाडे महाराज सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन कार्यक्रम दिनांक १ सप्टेंबर रोजी रविवारला सकाळी ११ वाजता संत संताजी जगनाडे महाराज अधिष्ठान चावडी मोहला चिमूर येथे आयोजित केलेला आहे.
कार्यक्रमाचे भूमिपूजन चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडिया यांचे शुभहस्ते पार पडणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. महादेवराव पिसे जेष्ठ समाजसेवक, तर प्रमुख अतिथी डॉ. सुप्रियाताई राठोड, मुख्याधिकारी, न. प. चिमूर, गजानन उमाटे, जेष्ठ वक्ते, तेली समाज, रघुनाथजी शेंडे, केंद्रीय अध्यक्ष, विदर्भ तेली समाज, भाग्यवानजी खोब्रागडे, सामाजीक कार्यकर्ता, तेली समाज, प्रकाश देवतळे, राजु अगडे, अध्यक्ष, श्री संत संताजी जगनाडे महाराज, प्रदिप बंडे, लताताई अगडे, सामाजीक कार्यकर्त्या, मनिषाताई कावरे, मिनाक्षी बंडे, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
भूमिपूजन कार्यक्रमाला तेली समाज बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री संत संताजी जगनाडे महाराज कल्याणकारी मंडळ, चिमूर तथा सर्व तेली समाज बांधव चिमूर यांनी केले आहे.