Home महाराष्ट्र ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींना मिळणार मोपेड, ई-स्कुटर, ई-रिक्षा

ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींना मिळणार मोपेड, ई-स्कुटर, ई-रिक्षा

346

 

चंद्रपूर, दि. 29 : समाज कल्याण विभागाच्या 5 टक्के दिव्यांग कल्याण अखर्चित निधीतून दिव्यांगांसाठी वयैक्तीक लाभाच्या योजना सन 2024-25 मध्ये राबविण्यात येत आहे. तरी ग्रामिण क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींनी योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टीने अर्ज आणि आवश्यक दस्ताऐवज जि.प. समाज कल्याण विभाग, चंद्रपूर येथे सादर करावयाचे आहेत.

दिव्यांग व्यक्तींना अर्जासोबत किमान 40 टक्के दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, बॅक पासबुक, 18 वर्ष पूर्ण झाल्याचा वयाचा पुरावा, रहिवासी दाखला किंवा स्वयंघोषणापत्र या कागदपत्रासह ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा. ग्रामीण भागातील दिव्यांगांनी अर्ज ग्रामपंचायत, पंचायत समिती, जि.प. समाज कल्याण विभाग येथून घ्यावेत व सदर अर्ज संबंधित पंचायत समिती किंवा समाज कल्याण विभाग, जि.प. येथे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

००००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here