Home लेख वय झाले म्हणजे म्हातारे झाले असे होत नाही!

वय झाले म्हणजे म्हातारे झाले असे होत नाही!

498

 

 

 

भारतीय उद्योग क्षेत्रातील उद्योगरत्न मा.रतनजी टाटांनी (आता वय 94 वर्ष), चित्रपट सृष्टीचे महानायक प्रसिद्ध अभिनेते अमिताभ बच्चन जन्म 11 ऑक्टोबर 1942 वय 82 आज ही सिनेमा, जाहिरात, कोण बनेगा करोडपती सारख्या शो मध्ये दमदारपणे काम करीत आहेत. देशातील राजकारणातील सुप्रसिद्ध आणि कुप्रसिद्ध जाणते राजे श्री. शरदचंद्र पवार जन्म 12 डिसेंबर 1940, वय 84 आज ही घरात न बसता पायाला भिंगरी लाऊन फिरतात. राजकारणात त्यांचे जेवढे मित्र आहेत त्यांचा किती पटीने शत्रू सुद्धा आहेत. तरी वय झाले म्हातारा झाले म्हणून घरात बसत नाही. आपण सेवा निवृत झाला म्हणजे म्हातारे झाला असे नाही. हेच मी या लेख द्वारे सेवानिवृत झालेल्या कर्मचारी अधिकारी यांना सांगण्याचा प्रयत्न करतो.

नोकरीत असतांना प्रथम स्वताचे लग्न. नंतर मुलांचे शिक्षण त्यांची नोकरी मुलाचे लग्न यातच आपण सेवा निवृत होत असतो. यात आपण काय विसरतो तर श्रीमंत होण्यासाठी आपल्या मुलांना शिकवतो. पण त्यांना आनंदी राहण्यासाठी शिकवत नाही. ज्यामुळे मोठ झाल्यावर त्यांना वस्तूंचं महत्त्व आणि मूल्य कळेल किंमत नाही. तुमचं जेवण तुम्ही तुमचं औषध समजून घ्या नाहीतर औषधच तुम्हाला जेवण म्हणून घ्यावं लागेल. जी व्यक्ती तुमच्यावर प्रेम करते ती तुम्हाला कधीही सोडून जाणार नाही कारण तुम्हाला सोडून जाण्याची शंभर जरी कारणं असली तरीही त्या व्यक्तीला एकच कारण असं सापडेल की ज्यामुळे ती व्यक्ती तुम्हाला सोडून जाणार नाही. मानव असणे आणि मानवता असणे या मध्ये खूप फरक आहे.ज्या वेळी तुमचा जन्म होतो त्यावेळी तुमच्या वर प्रेम केले जाते. आणि ज्यावेळी तुम्ही मृत होता त्या वेळी ही तुमच्या वर प्रेम केले जात नाही. त्यावेळी दहा बारा तासाच्या आत तुमची बॉडी घराबाहेर काढली जाते. कारण तुमचे शरीर त्यांच्या कामाचे उरले नसते. तुमचे कपडे लत्ते, औषध, चश्मा, काठी उशी काहीच घरात ठेवले जात नाही. का? तुम्ही कमवलेली संपती, पॉपर्टी गाडी, बंगला प्लॉट शेतजमीनचा सातबारा कोणी का देत नाही? परंतु अशा वेळी तुम्ही ज्या संस्था संघटनेत काम करत होता. ते जमवलेली मित्र मंडळी हितचिंतक तुम्हाला एकटे सोडत नाही. शेवट पर्यन्त म्हणजे अग्नी देपर्यंत तुमच्या साठी थांबतात. म्हणूनच सेवेत असतांना आणि सेवानिवृत झाल्यावर संस्था संघटनेत कायम स्वरूपी किर्याशील राहा. घरातील मंडळी एका महिन्यात विसरतील पण समाजातील संस्था, संघटनेतील लोक प्रत्येक वेळी आठवण काढतील. प्रत्येक जन आंदोलनात, सामाजिक, शैक्षणिक कार्यात आपला सहभाग आणि आर्थिक योगदान इतरांना कायम प्रेरणा देणारी आणि लक्षवेधी असणारी असायला हवी. जे सेवा, नोकरी करीत असतांना जमले नाही. ते सेवा निवृती नंतर करू शकता. म्हणूनच हे विसरा वय झाले म्हणजे म्हातारे झाले असे होत नाही.
सेवा,नोकरी करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे तुम्हाला वेगात चालायच असेल तर एकटं चाला पण दूरवर चालत जावे लागणार असेल तर एकत्र चाला.जगातील सर्वात चांगले सहा डॉक्टर
१) सूर्यप्रकाश
२) विश्रांती
३) व्यायाम
४) योग्य आहार
५) आत्मविश्वास
आणि ६) मित्र.

यांना आयुष्याच्या सगळ्या टप्प्यांवर यांना सांभाळा आणि आरोग्यदायी जीवन जगा.जेव्हा तुम्ही चंद्र पाहता त्यावेळी तुम्ही निसर्गाने दिलेले सौंदर्य पाहता, जेव्हा तुम्ही सूर्य पाहता त्या वेळी तुम्ही निसर्गाचे सामर्थ्य पाहता, ज्यावेळी तुम्ही आरसा पाहता त्यावेळी तुम्ही निसर्गाची सर्वोत्कृष्ट निर्मिती पाहता. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा! आपण सगळे जण प्रवासी आहोत आपला अंतिम मुक्काम आधीच ठरलेला आहे हे जीवन ही एक सहल समजून आनंद घ्यावा आणि इतरांना द्यावा. मी अधिकारी होतो, मॅनेजर होते. हे विसरून समाजात वावरला तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यात मान सन्मान आपो आप मिळत असतो. पण त्यासाठी सहभाग आर्थिक योगदान देता आले पाहिजे.

नोकरीवर असा किंवा नसा एक मात्र लक्षात ठेवा जिभेचे वजन खूप हलके असते पण तिचा तोल सांभाळणे खूप कठीण असते. जीवन जगायचं पावलांप्रमाणे. प्रथम पडणार्‍या पावलाला गर्व नसतो, आणि मागे पडणाऱ्या पावलाला कुठलाच कमीपणा नसतो. पाठ मजबूत ठेवा. कारण शाब्बासकी किंवा धोका पाठीमागूनच मिळणार असतो. माणसाने नोकरीत असतांना घमेंडीत एवढे उडू नये. की एक दिवस सेवा निवृती नंतर समाजात म्हणजेच जमिनीवरच पाय व पाठ ठेवायची असते हे विसरु नये.सगळ्यात सुंदर नातं हे डोळ्यांचे असते. एकत्र मिटतात, उघडतात, रडतात आणि एकत्र झोपतात पण एकमेकांना न पाहता. नातं हे हात आणि डोळ्यांप्रमाणेपण असावं. कारण हाताला लागलं की डोळ्यात पाणी येतं आणि डोळ्यात पाणी आलं तर हात डोळे पुसतात. एकदा हाताने पायांना विचारले, तुझ्यावर सगळे डोके ठेवतात तो अधिकार मला का नाही, त्यावर पाय हसून म्हणाले यासाठी जमिनीवर असावं लागतं, हवेत नाही.दुःखात बोटं अश्रू पुसतात तर आनंदात तीच बोटं टाळ्या वाजवतात, आपले अवयवच असे वागतात तर दुनियेकडून काय अपेक्षा ठेवायची.जगातील सुंदर जोडी म्हणजे अश्रू आणि हास्य पण ते एकत्र कधीच नसतात, पण जेव्हा एकत्र येतात तो सगळ्यात सुंदर क्षण असतो. एकदा देवाच्या पायावरची फुले गळ्यातील फुलांना म्हणाली, तुम्ही असं कोणतं पुण्य केलं म्हणून देवाच्या गळ्यात आहात? त्यावर हारातील फुले म्हणाली त्यासाठी काळजात सुई टोचून घ्यावी लागते. कान नावाचा घातक अवयव जे ऐकतो तेच डोळ्यांना बघायला लावतो.या जगात चपलेशिवाय योग्य जोडीदार कोणीच नाही. कारण एक हरवली की दुसऱ्याचं जीवन तिथेच संपते.दुरावा कोणतंही नातं संपवत नाही आणि जवळीक कोणतंही नातं घट्ट करत नाही.तर नात्यांची घेतलेली काळजी आणि केलेला सन्मान यामुळे नातं अधिक मजबूत होतं,नात ते टिकतं ज्यात शब्द कमी आणि समज जास्त असते, तक्रार कमी आणि प्रेम जास्त असते. अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो.
सेवानिवृती आणि म्हातारपणाची सर्व लक्षणे समजून घ्या आणि ठरवा कि तुम्ही किती म्हातारे झाला आहात. मित्र बोलावत आहेत परंतु तुम्हाला जावसं वाटत नसेल, तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात. मस्त मौजमस्ती करणा-या लहान मुलांवर कारण नसताना चिडलात तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात. रेडिओ वर सुमधूर गीतांचा कार्यक्रम चालू आहे आणि डोक्याला बाम लावावासा वाटत असेल तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात. धमाल मस्तीचा सिनेमा सुरू आहे आणि तुम्ही टीका करायला सुरुवात करता तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात. मस्त मजेत मैफिल चालू आहे आणि तुम्ही सल्ला द्यायला सुरुवात करता तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात. नवीन कपडे खरेदी करायची इच्छा होत नसेल तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात. फुलांवर भ्रमर बघून रोमँटिक गीत आठवत नसेल तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात. नव तरूणांच्या कपड्यांवर वारंवार टिपण्या करीत असाल तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात. रेस्टॉरंटमध्ये जाऊन घरच्या अन्नाची स्तुती करायला लागलात तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात. बेफिकीरी सोडून डोक्यावर चिंतेच्या टोपल्या ठेवायला लागलात तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात.पावसात भिजायचा आनंद सोडून छत्री आठवत असेल तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात. ग्रुप मधे आलेल्या सर्व पोस्टना कंटाळला असाल तर समजा तुम्ही म्हातारे झाला आहात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही ग्रुपवर कांहीच पोस्ट टाकत नसाल,तर तुम्ही नक्की म्हातारे झाला आहात !

सागर रामभाऊ तायडे, भांडुप, मुंबई.
मो. 9920403859

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here