Home यवतमाळ उमरखेड तालुक्यामध्ये सर्व शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे (प्रहार जनशक्ती...

उमरखेड तालुक्यामध्ये सर्व शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे (प्रहार जनशक्ती पक्ष शाखा बाळदीच्या वतीने गटशिक्षण अधिकार्‍यांना निवेदन)

96

 

✒️ सिध्दार्थ दिवेकर (यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी) मो.9823995466

उमरखेड :- (दिनांक २८ ऑगस्ट) उमरखेड तालुक्यामध्ये अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये सर्व कक्ष खोलीमध्ये सी.सी.टी.व्ही कॅमेरे बसवावे व येणार्‍या जाणार्‍या पालकांची नोंद ठेवावी.

अशा आशयाचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्ष शाखा बाळदीच्या वतीने गटशिक्षण अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.
उमरखेड पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या सर्व नगरपालिका व जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रत्येक खोलीमध्ये कॅमेरे लावणे व मुलींची ची सुरक्षा अत्यंत घेणे गरजेचे आहे.

विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन एक आठवड्यात करण्यात यावेअशा सूचना शिक्षण विभागाने सर्व शाळांना दिल्या आहे, शिक्षण अधिकाऱ्यांच्या स्तरावून सुरक्षा समिती गठीत करण्यात यावी ज्याप्रकारे कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळाबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगाने उपाय योजना करण्यात आले आहेत.
त्याच प्रकारे शाळेला विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने देखील अशा उपयोजना करणे गरजेचे आहे.
शाळांमध्ये तक्रारपेटी बसविण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आलेल्या आहेत. शाळा व्यवस्थापकावर याबाबतची जबाबदारी असेल तक्रार पेटीत विद्यार्थी त्यांच्या तक्रारी नोंदवतील आणि त्यानंतर या तक्रारीचा तपास योग्य पद्धतीने करणे ही जबाबदारी शाळेच्या मुख्याध्यापकाची असणार.
निवेदन देताना, प्रवीण बा इंगळे (प्रहार शाखाप्रमुख बाळदी ) अविनाश दुधे, सुनील खोलगाडगे, तेजस कदम, गजानन मिराशे, आदी प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here