विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाज नेत्यांनी आपल्या निष्ठावंत हजारो कार्यकर्त्यांना सोबत घेऊन राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी ओबीसी आरक्षण बचाव साठी आमरण उपोषण करावे. सद्यस्थितीत राज्यात ओबीसी आरक्षणाचा विषय चांगलाच तापलेला असून राज्यातील प्रत्येक ओबीसी संघटना आणि ओबीसी नेते आपापल्या परीने ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत, काही ठिकाणी ओबीसी नेते आणि विविध पातळीवरील पदाधिकारी कार्यकर्ते विविध पध्दतीने ओबीसी संदर्भात समाज जागृती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत तर काही ठिकाणी उपोषणाचा कार्यक्रम आयोजित करीत आहेत. अशा वेळी विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाज हा संवैधानिक दृष्टीने ओबीसी प्रवर्गातील एक महत्वाचा ओबीसी घटक असतांना ओबीसी म्हणून विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजातील स्वतःला ओबीसी सुतार समाजाचे नेतृत्व समजणाऱ्या सर्वच तथाकथित स्वयंघोषित नेत्यांनी मग ते नेते गिरी करणारे मुरब्बी, दिग्गज, मातब्बर अनुभवी असो अथवा धडाकेबाज जिगरबाज युवक नेतृत्व असो, अशा सर्वच ओबीसी सुतार समाज नेत्यांनी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठीच्या लढाईत ओबीसी सुतार समाजाचे नेतृत्व म्हणून नैतिक जबाबदारीने उतरणे गरजेचे आहे.
विश्वकर्मीय राज्यस्तरीय ओबीसी सुतार समाजात ज्यांनी ज्यांनी गतकाळात समाज नेतेगिरीचे सोशल मीडियावर सुंदर छान छान फलक झळकवून नेतेगिरीचा मोठेपणा मिळविला असेल, समाज नेतेगिरीची भन्नाट तुफान प्रसिद्धी मिळविली असेल आणि सद्यस्थितीत समाजात जे जे स्वतःलाच आख्या विश्वकर्मीय राज्यस्तरीय ओबीसी सुतार समाजाचे कर्तृत्ववान कार्यसम्राट कर्तबगार समाज नेतृत्व समजत असतील त्या सर्वच समाज नेत्यांनी आपापल्या निष्ठावंत सहकारी मित्रांसोबत राज्यातील मध्यवर्ती ठिकाणी ओबीसी आरक्षण बचाव आमरण उपोषण करावे. त्या उपोषणात मी सर्वसामान्य ओबीसी सुतार समाज बांधव म्हणून निश्चितच सहभागी होतो.
विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजात नेतेगिरी करणाऱ्या सर्वच नेत्यांनी मग संबंधित नेतेगिरी करणारे दिग्गज मातब्बर असो अथवा धडाकेबाज कर्तृत्ववान युवक नेतेमंडळी असो, या सर्वच नेत्यांनी संपूर्ण राज्यात ओबीसी आरक्षण संदर्भात चैतन्य निर्माण करावे आणि आपापल्या धडाकेबाज नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यातील कानाकोपऱ्यात ओबीसी आरक्षण संदर्भात समाज जागृती निर्माण करण्यासाठी ठिकठिकाणी ओबीसी समाज जागृती मेळाव्याचे भव्यदिव्य मेळाव्याचे आयोजन करावे आणि लाखोंच्या संख्येने समाज बांधवांना एकत्रित करून आपापल्या ज्ञानाचा ज्ञान भांडार खुला करून जमलेल्या लाखोंच्या उपस्थित समुदायाला मंत्रमुग्ध करावे, आपला ज्ञानाचा ज्ञान भांडार खुला करावाजेणेकरून समाजात ओबीसी, आरक्षण इत्यादी विषया संदर्भात नवचैतन्य निर्माण होईल.
आजपर्यंत गेली अनेक वर्षांपासून गतकाळात विविध पातळीवर अनेक सुतार समाज बांधवांनी विश्वकर्मीय राज्यस्तरीय आदर्श बुद्धिमान ओबीसी सुतार समाजात दिग्गज, मातब्बर, कर्तबगार, कर्तृत्ववान, कार्यसम्राट, धडाकेबाज इत्यादी अनमोल बहुमोल सन्मानजनक समाज नेतेगिरीचा मनमुरादपणे, मनसोक्तपणे आनंद उपभोगला असेल आणि सद्यस्थितीत नेतेगिरीचा टेंभा मिरवत असतील अशा सर्वच कर्तबगार, कर्तृत्ववान, कार्यसम्राट,दिग्गज धुरंधर, मातब्बर, धडाकेबाज युवक नेत्यांनी जोरदार फिल्डींग लावावी, जोरदार ताकदीने उपोषणासाठी बसणार आहोत या संदर्भात सर्वच प्रकारच्या सोशल मीडियावर जोरदार प्रसिद्धी करावी. यासाठी स्पेशल प्रसिद्धी पत्रक काढावे विशेषतः यासाठी आवर्जून सर्वच समाज नेत्यांनी आपापली सामाजिक यंत्रणा कामाला लावावी आणि जोरदार प्रचार करावा.
त्यासाठी संपूर्ण राज्यस्तरीय ओबीसी सुतार समाजात सगळीकडे कानाकोपऱ्यात वाडीवस्ती, गावागावात, खेडोपाडी, शहरात या संदर्भात संपूर्ण विश्वकर्मीय राज्यस्तरीय ओबीसी सुतार समाजाला माहिती व्हावी, यासाठी समाजात आपण केलेल्या आणि समाजात निरपेक्ष शुद्ध हेतूने करीत असलेल्या समाजहितासाठी समाजोपयोगी विविध उपक्रमांची माहिती प्रसिद्धी करण्यासाठी असलेली आपापली तरबेज यंत्रणा राबवावी आणि आपापल्या संघटनांच्या लेटरपॅडवर संबंधित जबाबदार पदाधिकारी यांची स्वाक्षरी करून खाली नाव लिहून आणि शिक्का मारून प्रसिद्ध करावे. गरज भासल्यास यासाठी स्पेशल भव्यदिव्य पत्रकार परिषद आयोजित करावी.
या ओबीसी आरक्षण बचाव उपोषणासाठी संबंधित सर्वच विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाज नेत्यांनी लवकरच उपोषणाची तारीख आणि राज्यातील मध्यवर्ती ठिकाण जाहीर करावे आणि ओबीसी संदर्भात ओबीसी सुतार समाजातील जबाबदार नेतृत्व म्हणून नैतिक जबाबदारी म्हणून समाज नेतृत्व म्हणून ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी हातभार लावावा आणि खऱ्या अर्थाने विश्वकर्मीय ओबीसी सुतार समाजातील वैचारिक दृष्टीने परिपक्व नेतृत्व सिद्ध करावे, तरच आपण विश्वकर्मीय राज्यस्तरीय आदर्श ओबीसी सुतार समाजात नेतेगिरी करण्यास लायक आणि अभिनंदनास सुद्धा लायक ठराल!
प्रमोद सूर्यवंशी, चिखली मातृतीर्थ बुलडाणा मो. 8605569521.