Home लेख भ.श्रीकृष्णाचा जन्म: मानवधर्म रक्षणार्थ! (गोकुळाष्टमी व गोपाळकाला- श्रीकृष्ण जयंती.)

भ.श्रीकृष्णाचा जन्म: मानवधर्म रक्षणार्थ! (गोकुळाष्टमी व गोपाळकाला- श्रीकृष्ण जयंती.)

94

 

_बाल कृष्ण हा फार प्रिय होता. असे मानले जाते की, बाल कृष्ण व त्यांचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर गोपाळकाला तयार करून सर्व वाटून खात असत. गोमंतकातील काल्याला गवळण कालासुद्धा म्हटले जाते. हे एक मिश्रण पौष्टीक आहार असते, म्हणूनही गोकुळाष्टमीचे महत्व अधिक आहे. कोकणात व महाराष्ट्रात उत्सवानिमित्त दहिकाला होतो. या ठिकाणीही हंड्या फोडून तर काही ठिकाणी गोपाळकाला होतो. गोकुळाष्टमीचे एक व्रतही सांगितले असून ते केल्याने संतती, संपत्ती व वैकुंठ लोक यांची प्राप्‍ती होते, असे वयोवृद्ध सांगतात. याविषयीची अधिक माहिती कृगोनि- श्री कृ. गो. निकोडे गुरूजींच्या शब्दांत वाचा… संपादक._

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार सृष्टी पालनकर्ता श्रीहरी विष्णूचे अठरावे अवतार प्रभू श्रीकृष्ण आहे. म्हणून त्याच्या जन्मदिवशी गोकुळाष्टमी साजरी केली जाते. त्याच्याबद्दल सांगायचे झाले तर त्यांनी आपल्या भुतलावर म्हणजे पृथ्वीवर एक साधारण माणसाचा जन्म घेतला होता. त्याचा जन्म हा मानवधर्माचे रक्षण करण्यासाठी झाला होता. त्यामुळे संपूर्ण भारतभर हजारो वर्षांपासून हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गोकुळाष्टमी भारतामध्ये वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या पद्धतीने भ.श्रीकृष्ण मूर्तीचे पूजन करून केले जाते. त्यास कान्होबा बसविणे किंवा मांडणे म्हटले जाते. काही ठिकाणी भक्ती संगीत गायले जाते. तर काही ठिकाणी कृष्णमूर्तीला दही दुधाचा अभिषेक घातला जातो. श्रीकृष्ण जयंती व जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी हा सण भारतामध्ये खुप आनंदाने साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. त्यामुळे संपूर्ण भारतामध्ये त्यांच्या जन्मदिवशी कान्होबा बसविणे वा दहीहंडीसारखे कार्यक्रम साजरे केले जातात. या दिवशी भगवान श्रीकृष्णाला वेगवेगळ्या नावांनी बोलावले जाते. जसे की गोविंद, बाल गोपाल, कान्हा, कान्होबा, गोपाल, केशव ही सर्व श्रीकृष्णांची प्रसिद्ध नावे आहेत. गोकुळाष्टमी ही भगवान श्रीकृष्णाच्या जन्मापासून हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी प्रत्येक वर्षी साजरी केली जात असल्याचे सांगितले जाते.
भ.श्रीकृष्णाचा जन्म श्रावण महिन्यात वद्य अष्टमीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत झाला. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. अष्टमीच्या दिवशी काही लोक व्रतसुद्धा करतात. या दिवशी एकभक्त राहून पांढर्‍या तिळाचा कलप अंगाला लावून स्नान करतात. व्रताचा संकल्प करून देवघर फुले व पाकळ्यांनी सुशोभित करतात. त्यास्थानी देवकीचे सुतीकागृह स्थापन करतात. मंचकावर देवकी आणि श्रीकृष्ण यांच्या मूर्तीची स्थापना करतात. बाजूला यशोदा व तिची नवजात कन्या, वसुदेव व नंद यांच्याही मूर्ती बसवतात. त्या वेळी मथुरेमधील राजा अत्याचारी कंस याला प्रजा कंटाळली होती. तो प्रजेला असह्य यातना आणि त्यांच्यावर फार जुलूम करत होता. त्यामुळे तेथील प्रजा खूपच दुःखी व कष्टी होती. लोकांना त्या अत्याचारी राजापासून मुक्ती देण्यासाठी भ.श्रीकृष्णाने पृथ्वीवर जन्म घेतला. गोकुळाष्टमी या निमित्त होणारी हालचाल संपूर्ण भारतामध्ये दिसून येते. त्याचबरोबर परदेशी राहणाऱ्या भारतीय लोकांतसुद्धा गोकुळाष्टमी खुप धुमधडाक्यात साजरी केली जाते. भ.श्रीकृष्णाने पृथ्वीवर देवकी आणि वासुदेव यांच्या पोटी जन्म घेतला. भ.श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळेस अाकाशवाणी झाली होती, की देवकीचा आठवा पुत्र कंसाचा वध करेल. कंसाच्या अत्याचारांनी संपूर्ण मथुरा नगरी त्रस्त झालेली होती. त्याच्या राज्यात राज्यांमध्ये निर्दोष लोकांना सुद्धा शिक्षा केली जाई. आपल्या मृत्यूच्या भीतीने त्याने एवढेच नव्हे तर आपली बहिण देवकी आणि तिचा पती वासुदेव ह्यांना सुद्धा काळ कोठळीमध्ये टाकले होते. एवढेच नव्हे तर कंसाने आपल्या अत्याचाराने देवकीचे सहा पुत्रही आधीच मारून टाकले होते.
भ.श्रीकृष्णांच्या जन्मदिवशी आकाशामधून घनघोर पावसाचा वर्षाव होण्यास सुरुवात झाली. बाल कृष्णाला सुरक्षित स्थानावर घेऊन जाण्यासाठी वसुदेव यांनी त्याला एका टोपलीत घेतले. यमुना नदी पार करत त्यांनी त्याला आपला मित्र नंद गोपालकडे नेले आणि त्यांनी आपल्या पुत्राला- बाल कृष्णाला यशोदा मातेपाशी झोपून ठेवून त्यांची कन्या घेऊन परत आले. अशा प्रकारे देवकीपुत्र भ.श्रीकृष्णाचे पालन-पोषण यशोदा मातेने केले. अशाप्रकारे भ.श्रीकृष्णाच्या दोन माता होत्या, एक जन्मदात्री आणि दुसरी पालनकर्ती. एक म्हणजे देवकीमाता आणि दुसरी म्हणजे यशोदामाता होय.
बाल कृष्ण हा फार प्रिय होता. असे मानले जाते की, बाल कृष्ण व त्यांचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर गोपाळकाला तयार करून सर्व वाटून खात असत. गोमंतकातील काल्याला गवळण कालासुद्धा म्हटले जाते. हे एक मिश्रण पौष्टीक आहार असते, म्हणूनही गोकुळाष्टमीचे महत्व अधिक आहे. कोकणात व महाराष्ट्रात उत्सवानिमित्त दहिकाला होतो. या ठिकाणीही हंड्या फोडून तर काही ठिकाणी गोपाळकाला होतो. गोकुळाष्टमीचे एक व्रतही सांगितले असून ते केल्याने संतती, संपत्ती व वैकुंठ लोक यांची प्राप्‍ती होते, असे वयोवृद्ध सांगतात. सप्तमीच्या मध्यरात्री सुचिर्भूत होऊन संकल्प करतात व सहपरिवार भ.श्रीकृष्णाची पूजा करतात. अष्टमीच्या दिवशी देवालाही फराळ, नैवेद्य दाखवतात. गोपाल म्हणजे गायीगुरे व कायद्याचे पालन करणाऱ्या या भ.श्रीकृष्णाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने दुसऱ्या दिवशी- गोपाळकाल्याच्या दिवशी काल्याचा प्रसाद केला जातो. यामध्ये काला म्हणजे एकत्र मिळवणे. पोहे, ज्वारीच्या लाह्या, लिंबू व आंब्याचे लोणचे, दही, भिजवलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी आदी घालून एक खाद्यपदार्थ तयार होतो, त्यास गोपालकाला असे म्हणतात.
श्रीकृष्णभक्त गोकुळाष्टमीच्या उत्सवावर उपवास ठेवत असतात, मंदिरांना सजवले जाते तसेच गोपाळमूर्तीला पाळण्यात ठेवून झोका दिला जातो. भजन-कीर्तन केले जाते आणि त्यासोबतच तरुणांमध्ये दहीहंडी फोडण्याची स्पर्धा घेतली जाते. श्रीकृष्णनगरी मथुरामध्ये सुद्धा दुरून दुरून भक्तमंळी दर्शनासाठी येत असतात. त्या दिवशी संपूर्ण मथुरानगरी भ.श्रीकृष्णाच्या नामोच्चाराने दुमदुमून जाते. श्रीकृष्णाच्या लहानपणी लोणी, दही, दूध आपल्या मित्रांसोबत एकत्र येऊन चोरून खाण्याचा प्रयत्न करीत असत. दही हे त्यांचे आवडते खाद्य होते. म्हणून दहीहंडी महोत्सव त्यांच्या आठवणी निमित्त साजरा केला जातो. उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपाळकाला असे म्हणतात. कृष्णजयंतीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. महाराष्ट्रात विशेषत कोकणात या सणानिमित्त दुसऱ्या दिवशी दहीकाला केला जातो. त्याचे जेवण करून उपवास सोडला जातो. गोविंदा आला रे गोविंदा आला, गोकुळात आनंद झाला. असे गाणे म्हणत लहान-मोठे पुरुष घरोघरी नाचायला जातात व दहीहंडी फोडतात.
कित्येक ठिकाणी गोपाळकाला करून श्रीकृष्ण चरित्रातील सोंगे करण्याचीही प्रथा आहे. या दिवशी महाराष्ट्रात मुंबई येथे उच्च मडक्यात दही, दूध यांनी भरलेला हंडा ठेवून तिथपर्यंत मानवी मनोरेची स्थापना करून दहीहंडा फोडण्याचा साहसी खेळ होतो. महाराष्ट्रातील एक वैष्णव वृत्त आहे. श्रीकृष्ण त्याच्या मित्रांसोबत गाई चारण्यासाठी जात असत व आपले सवंगडी या सर्वांच्या शिदोर्‍या एकत्र करून त्या खाद्यपदार्थाचा काला केला व सर्वात सत्याचे रक्षण केले, अशी एक कथा आहे. म्हणून या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा आहे. अशाप्रकारे गोकुळाष्टमी भारतातील विविध राज्यात मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरी केली जाते.
!! श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या समस्त भाविकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!


कृगोनि- श्री कृ. गो. निकोडे गुरूजी.
रामनगर, वॉर्ड नं. २०, गडचिरोली.
मृदूभाष क्र. ७७७५०४१०८६.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here