अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515
गंगाखेड :- डॉ.साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, महाकवी वामनदादा कर्डक यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने बामसेफ जिल्हा युनिटच्यावतीने 25 ऑगस्ट रोजी “सामाजिक न्यायातील आरक्षणाची संविधानिक भूमिका” या विषयावर जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक न्यायातील आरक्षणाची संविधानिक भूमिका” या विषयावर जाहीर व्याख्यानाचेहोते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे महाकवी वामनदादा कर्डक जयंती निमित्ताने बोलताना डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष मा.अजिंक्य चांदणे म्हणाले,भारतीय संविधानातील आरक्षण पद्धत पाहता सामाजिक, शैक्षणिक,आर्थिक इत्यादी बाबींचा विचार करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती केली त्यामुळे मनुवादी प्रस्थापितना सर्व आरक्षण पद्धत संपवण्याच्या उद्देशाने मुद्दाहून जाती-जातीमध्ये तेढ/ वाद निर्माण करून आरक्षण विषयी मुद्दामहून 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती दिनी न्यायालयाच्या वतीने आरक्षण वर्गीकरणावर निर्णय काढले असता मातंग व बौद्ध बांधव यांनी हे षडयंत्र ओळखलं पाहिजे.फुले आंबेडकरी चळवळी मधील बौद्ध बांधवांनी मोठ्या भावाची भूमिका बजावत मातंग समाजाला फुले आंबेडकरी चळवळीमध्ये सहभागी करून घेतली पाहिजे.तसे पाहता मातंग समाजातील बांधव मनुवादी प्रस्थापित चळवळीच्या जवळ जाऊ नये? यासाठी मातंग समाजातील सुखदुःखात सामील होऊन त्यांना आपलंसं केलं पाहिजे.त्याला समजावून सांगितलं पाहिजे आरक्षणाच्या वर्गीकरणावरील संकट लक्षात घेता अनुसूचित जाती मधील सर्व घटकांना वर्गीकरणाचे फायदे/तोटे यावर जनजागृती करत बौद्ध बांधवांनी पुढाकार घेतला पाहिजे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील साम्य हे लक्षात घेता गुरु /शिष्याचे नाते नाते आपण नेहमी सांगितले पाहिजे.याप्रसंगी आंबेजोगाई येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते संदीप थोरात, इन्साफची राष्ट्रीय महासचिव मिलिंद भिंगारे,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलासराव जंगले,यांचीही विचार मंचावर उपस्थिती होती.बामसेफ च्या वतीने संयुक्त जयंती निमित्त दुपारी साडे-बारा वाजता व्याख्यान सुरू होण्याअगोदर महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करून सुरुवात करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्येक्ष स्थानी संत जनाबाई महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एम. डी. इंगोले होते तर व सूत्रसंचालन बामसेफचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण वावळे तर आभार प्रदर्शन डी.जे.भदर्गे यांनी केले तर प्रास्ताविक एम. डी. कोटमुकले यांनी केले.