अमरावती (प्रति.)
महात्मा फुले शिक्षण समिती द्वारा संचालित मुधोळकर पेठ येथील महात्मा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात स्वातंत्र दिन साजरा करण्यात आला. स्वातंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण महात्मा फुले शिक्षण समितीचे सहसचिव व महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख प्रा.किशोर श्रीखंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी दहावी बारावीच्या परीक्षेत गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान अमरावती तर्फे कै.बाबारावजी बुंदेले यांच्या स्मृती प्रित्यर्थ प्रा.अरुण बुंदेले व मान्यवरांच्या हस्ते वर्ग बारावी मध्ये प्रथम आलेली कु.दीपाली वडे व दहाव्या वर्गात प्रथम आलेल्या कृष्णा सतीश तिवारी या दोन्ही विद्यार्थ्यांना रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.प्रा अरुण बुंदेले हे कै.मैनाबाई बुंदेले स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दहावी व बारावी परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा रोख रक्कम व सन्मानपत्र देऊन सत्कार करत असतात. यावेळी संविधान गुणगौरव परीक्षेतील उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला.
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीताचे गायन करून विविध नृत्य सादर केले .तर प्रमुख अतिथी प्रा.अरुण बुंदेले यांनी स्वरचित “स्वातंत्र्याचा दिन” या अभंगाचे गायन करून “स्वातंत्र्य दिन व आजचा विद्यार्थी” या विषयावर विचार व्यक्त केले .
या कार्यक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा मंदाकिनी निमकर,सचिव रमेश पवार,सदस्य मनोज भेले,सहसचिव किशोर श्रीखंडे, प्राचार्य मंगेश गोरडे, प्रा.श्रीकृष्ण बनसोड,प्रा सुरेश यावले ,प्रा. जयंत पवार, प्रा.राजेंद्र तायडे,प्रा. संजय शेंडे,जयश्री आडे,गजानन पोटदुखे,अमोल इंगळे,अनिल मावसकर ,मिलिंद बेलसरे,किसन चव्हाण,राजेश ढेवले आदी उपस्थित होते.