Home चंद्रपूर शेवटच्या श्वासापर्यंत भांगडिया परिवार हजारो बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील-आमदार किर्तीकुमार (बंटी)...

शेवटच्या श्वासापर्यंत भांगडिया परिवार हजारो बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील-आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडिया सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी यांचेसह हजारो महिलांनी रक्षाबंधन कार्यक्रमात दर्शविली उपस्थिती

285

 

 

चिमूर – रक्षा बंधनाचा कार्यक्रम हा बहीण-भावाच्या प्रेमाचा उत्सव आहे, आपण हा कार्यक्रम दरवर्षी साजरा करीत असतो, बहिणींच्या संरक्षण करण्यासाठी आपण सदैव तप्तर असेन, शेवटच्या श्वासापर्यंत बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन असे मत आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडिया यांनी व्यक्त केले.

तालुका भाजपा महीला आघाडी चिमूरच्या वतीने चिमूर कॉटन इंडस्ट्रीजच्या भव्य परीसरात दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. त्यात हजारो बहीणीनी चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तीकुमार (बंटी) भांगडिया यांना औक्षवण करुन हजारों बहिणींनी राख्या बांधल्या.
या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणुन मराठी सिनेअभिनेत्री प्राजक्ता माळी उपस्थित होत्या. यावेळी भांगडिया फाऊंडेशनच्या मेघा भांगडिया, अपर्णा भांगडीया, भाजपा महिला तालुका आघाडीच्या अध्यक्षा माया नन्नावरे, घनश्याम डुकरे, राजु देवतळे, निलम राचलवार, एकनाथ थुटे, विनोद रणदिवे, भिमराव ठावरी, माजी नगरसेवक छायाताई कांचार्लावार, माजी जिल्हा परिषद सदस्य ममता डुकरे, गिता लिंगायत, अल्का लोणकर, पुष्पा हरणे, प्रिया जयकर आदी महीला मंचावर यांची उपस्थिती होते.
यावेळी आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी मार्गदर्शनपर भाषणात म्हणाले की, मी दरवर्षी हा रक्षा बंधनाचा कार्यक्रम आयोजित करीत असतो. शेवटच्या श्वासापर्यंत हा बंटी भांगडिया माझ्या हजारो बहिणीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील व त्यांना सरळ हाताने मदत करण्याचे दिवसरात्र काम करेल अन् करीत आहेत. तसेच माझ्या बहिणी या भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपल्या भावाच्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावाच्या हाताचे मनगट अधीक मजबूत करतील हा विश्वास माझा माझ्या बहिणीवर आहे. आज तीनशे ते चारशे रूपये मजूरी सोडून माझ्या बहिणी माजी ताकद वाढविण्यासाठी स्वईछेने हजारोच्या संख्येने उपस्थित झालेत. माझ्या बहिणी जेव्हा जेव्हा आवाज देतील तेव्हा तेव्हा हा भाऊ ढाल बनून आपल्या पाठीशी उभा राहिल असा विश्वास माझ्या हजारो बहिणींना रक्षाबंधन कार्यक्रमाच्या प्रसंगी देतो. असे आपल्या मार्गदर्शनात आमदार बंटी भांगडिया यांनी सांगितले.

यावेळी प्राजक्ता माळी यांनी बोलतांना सांगितले की, आपण चिमूर विधानसभा क्षेत्रात केलेल्या विकास कामाच्या कामावर विश्वास ठेवूनच या बहिणी हजारोंच्या संख्येने आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. म्हणूनच आज या रक्षाबंधन कार्यक्रमाला उपस्थित राहून आपले मनगट मजबूत करण्यासाठी याठिकाणी आले आहेत. बंटीभाऊ तूम्ही लढा आम्ही बहिणी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. असे सिने अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी बोलतांना सांगितले.

आमदार भांगडिया यांनी राज्य शासन व केंद्र सरकारने महिलांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्या योजनेचा फायदा माझ्या बहिणीनी घ्यावा असे सुद्धा शेवटी सांगितले
सदर कार्यक्रमाचे संचालन भाजपाच्या रितू पोहीनकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन भारती गोडे यांनी केले. या कार्यक्रमाला तालुक्यातील जवळपास हजारोच्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here