*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड) मोबा. 9075686100*
म्हसवड : बदलापूरमध्ये अल्पवयीन चिमुकलीवर शाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात माण खटावची महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रीय काँग्रेस पार्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह महाविकास आघाडीतील घटक पक्ष आंदोलनात सहभागी झाले होते. महाविकास आघाडीतील महिला पदाधिकाऱ्यांनी बदला पुरातील आरोपींना फासावर लटकवण्याची मागणी केली. दरम्यान माणच्या तहसील कार्यालयासमोरील पायऱ्यांवर उभा राहून महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
या आंदोलनात राशप महिला पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा कविता म्हेत्रे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाळासाहेब सावंत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष राजू मुळीक, दहिवडीचे नगराध्यक्ष सागर पोळ, नगरसेविका सुरेखा पखाले, माण खटाव युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रशांत विरकर, उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे, महेंद्र जाधव, रविंद्र जाधव यांच्यासह महाविकास आघाडीच्या जवळपास ३५ पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी कविता म्हेत्रे म्हणाल्या की, बदलापूरची घटना गांभीर्याची आहे. गुन्हा दाखल करण्यासाठी सरकारला बारा तास लागतात. यापेक्षा दुर्दैव कोणते असू शकते. घटना घडल्यानंतर पीडित कुटुंबीय पो लीस चौकीत गेल्यानंतर राज्याचे गृहमंत्री दिल्लीला होते. बालिकांवर होणारे लैंगिक अत्याचार फुले, शाह, आंबेडकरांच्या महाराष्ट्राला शोभणारे ना- हीत. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिन्याला दीड हजार देण्याऐवजी बहिणींना सुरक्षा द्या. या सरकारला महिला भगिनींबद्दल
घेणेदेणे नाही. गृहमंत्र्यांनी
पक्ष फोडाफोडी करण्याऐवजी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली.
नगरसेविका सुरेखा पखाले म्हणाल्या की, दबावाखाली पो- लीस यंत्रणा काम करत असून बारा तास गुन्हा दाखल करण्यास विलंब करण्यात आला. शिक्षण संस्थेशी संबंधित असणारे भाजप- चे पदाधिकारी आहेत, त्यामुळे कारवाईस विलंब केला जा- तोय. जनतेचा उद्रेक होईपर्यंत गृह विभागाने नराधमावर गुन्हा दाखल केला नाही. शिवसेना शिंदे गटाचा माजी नगराध्यक्ष महिला पत्रकाराबद्दल अश्शील भाषेत बोलतो. तरीहा सरकार बघ्याच्या भूमिकेत आहे. त्यावर सरकारने तात्काळ कारवाई केली पाहिजे. परिस्थिती बघून राजकारण करा. ही वेळ राजकारण करण्याची नाही. महायुती सरकार निष्क्रिय ठरले आहे. या सरकारचा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो.