Home महाराष्ट्र जेष्ठ नागरिक हे कुटुंबातील संस्कृतीचे वाहक आहेत त्यांचा आदर करावा-प्राचार्य डॉ.दीनानाथ फुलवाडकर

जेष्ठ नागरिक हे कुटुंबातील संस्कृतीचे वाहक आहेत त्यांचा आदर करावा-प्राचार्य डॉ.दीनानाथ फुलवाडकर

218

 

अनिल साळवे, विशेष प्रतिनिधी मो. 86985 66515

गंगाखेड-लॉयन्स क्लब गंगाखेड टाऊन व व्यापारी महासंघ गंगाखेडच्या संयुक्त विद्यमाने दि.२२ ऑगस्ट गुरूवार रोजी जागतिक जेष्ठ नागरिक दिना निमित्य क्लबद्वारे गंगाखेड येथील विवीध क्षेत्रातील सन्माननीय सेवाभावी व सदैव कार्यमग्न असलेले जेष्ठ नागरिक यांचा शाल, श्रीफळ, एक रोपटे व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन क्लबचे अध्यक्ष लॉ.गोविंदराव निरस, लॉ.दगडूसेठ सोमाणी, लॉ.केशवराव देशमुख,लॉ.रामेश्वर तापडिया, लॉ.प्राचार्य डॉ.बालाजी ढाकणे, सचिव लॉ.प्रा.डॉ.राजीव आहेरकर कोषाध्यक्ष लॉ.दरलिंग भूसणर यांनी केले यावेळी प्रतेकानी आपल्या जीवनाचा अनुभव त्यांच्या मनोगतातून व्यक्त केला. सुभाषशेठ नळदकर यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना प्रतेकानी ईश्वराने दिलेल्या संधीचे सोने करावे , आपण आपले कार्य सातत्याने करावे यश निच्छित मिळणारच असे मत मांडले, गंगाखेड शहरात सातत्याने आरोग्य सेवा देणारे, सर्वात ज्येष्ठ, आदरणीय डॉ.शांतीलालजी काबरा यांनी मानव सेवा हीच ईश्वर सेवा आहे आणि ती प्रत्येकाने करावी मग तो कोणत्याही सेवाभावी क्षेत्रात कार्यकरणारा असो असे मत व्यक्त केले तर आदरणीय जेष्ठ लॉयन, माजी मुख्याधिकारी नगरपालिका गंगाखेडचे हरिश्चंद्र राठोर यांनी नित्य क्रमाने आपण कार्यात देव पाहावा व आपले कार्यच देवाची पूजा आहे असे मानून कार्य करावे असा विचार मांडला तर आदरणीय प्राचार्य डॉ दीनानाथ फुलवाडकर यांनी आजच्या युगात कुटुंब व्यवस्था हि मोबाईल च्या चुकीच्या वापरामुळे विलयास जात आहे ..ज्यांच्या घरात जेष्ठ सदस्य आहेत अश्याच घरात थोडा फार संस्कृतीचा लय उरला आहे त्यामुळे जेष्ठ नागरिक हे कुटुंबातील संस्कृतीचे वाहक आहेत त्यांचा आदर करावा असे मत मांडले. अध्यक्षीय समारोप करतांना आदरणीय लॉ.बाबासाहेब जामगे यांनी सर्व जेष्ठ नागरिकाचे क्लबच्या वतीने आभार माननले आणि जेष्ठ नागरिक भारतीय सामाजिक जीवनाचा कना आहेत त्यांची जपवणूक करणे हे आमच्या सारख्या तरुण देशाचे कर्तव्य आहे असे मत मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लॉ केशवराव देशमुख, सूत्रसंचलन लॉ विठ्ठलप्रसाद पवार तर आभार प्रदर्शन लॉ संभाजी वाडेवाले यांनी केले. याप्रसंगी लॉयन सदस्य तथा गंगाखेड तालुका सीड फर्टीलायझर संघटनेचे तालुकाध्यक्ष माऊली उर्फ ज्ञानेश्वर शिंदे यांचा ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला. यासोबतच ज्येष्ठ नागरिक, प्राचार्य विश्वनाथ सोन्नर, प्राध्यापक यू आर कुलकर्णी, दिगंबररावजी अनंतवार, चिंतामणी गुंडाळे, प्रकाशशेठ नळदकर या शहरातील ज्येष्ठ व्यापाऱ्यांचा वयाची 75 वर्ष पूर्ण करूनही व्यापारात असल्याबद्दल सत्कार करण्यात आला.या प्रसंगी लायन्स क्लबचे ज्येष्ठ सदस्य – संजय तापडिया, डॉ. ज्ञानोबा धुमाळ, मनोजशेठ नळदकर, प्रतापसिंग ठाकूर, नाथराव चाटे, नंदकुमार भरड, प्रभाकरराव देशमुख, ज्ञानेश्वर अनंतवार, ज्ञानेश्वर कापसे, संजयशेठ दुधाटे, बालाजी कांदे सर, विनायक दीडशेरे, शिवराज मुंडे, भगवानराव काळे, महादेव गीते, डॉ.बालासाहेब मानकर इत्यादी लॉयन मान्यवर उपस्थित होते .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here